Editor

अमित शाहंच्या टीकेवर उध्दव ठाकरेंचा पलटवार, मोगँबोने मिठाचा खडा टाकला आम्ही आता… निवडणूक निकालावरून अमित शाह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ठाकरेंचा पलटवार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणीची याचिका प्रलंबित असतानाच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण प्रकरणी निकाल देत एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहिर केला. यापार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांनी आयोगाच्या निकालाचा संदर्भ देत काल निवडणूक आयोगाने आपल्या निकालाच्या माध्यमातून दूध का दूध पानी …

Read More »

निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार म्हणाले, एकदाच सांगतो मी… आयोगाने दिलेल्या निकालाच्या दिवशी पवार म्हणाले, एकदा निकाल दिल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही

उध्दव ठाकरे विरूध्द एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असतानाच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या निकालावरून …

Read More »

यशवंतराव चव्हाण यांच्या वाक्याच्या संदर्भ देत अमित शाह म्हणाले, शिवाजी महाराज नसते तर…. शिवसृष्टीचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलताना दिला संदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत शिवशाहीर स्व.बाबासाहेब पुरंदरे यांच्या मनातील शिवसृष्टीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, मला आज यशवंतराव चव्हाण यांचं वाक्य आठवतं आहे ते म्हणाले होते की, छत्रपती शिवराय नसते तर भारताचं काय झालं …

Read More »

रोहित पवारांचा खोचक टोला, पुण्यात असूनही अमित शाहंनी प्रचार करणं टाळलं यातच सगळं आलं कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघात काय निकाल लागणार बहुधा अचूक हेरलं असावे असा

पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या दोन्ही जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईसह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असूनही कसबा आणि चिंचवड येथील भाजपा-शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली नाही. विशेष म्हणजे काल …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच आपल्याला शिवसेना हे नाव मिळाले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री …

Read More »

संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणासाठी २००० कोटींचा सौदा जे लोक न्याय विकत घेतात त्यांच्याबद्दल काय बोलणार

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि दुसऱ्याबाजूला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याप्रश्नी बंडखोर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुनावणी सुरु होती. मात्र शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. यावरून राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य …

Read More »

अमित शाहंचे येणे, कोश्यारींचे जाणे, आयोगाचा निकाल “आप क्रोनॉलॉजी को समझिए” ठाकरेंच्या ताब्यातील शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदेंच्या हातीः मॅटर स्क्रिपटेड?

राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे सादर करण्यात आलेली कागदपत्रे कोणती याबाबतचा अद्याप खुलासा झाला नाही. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येणे त्याच्या एक दिवस आधी भगतसिंग कोश्यारी यांचा …

Read More »

अजित पवारांचा पलटवार, त्या चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं जरा बोलण्यात… ४४० व्होल्टच्या टीकेवर अजित पवारांची तुफान टोलेबाजी

चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचे सर्व प्रयत्न भाजपा-शिंदे गटाचे अधुरेच राहिले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टीसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

मशाल चिन्हाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाकडून नव्या चिन्ह आणि नावासाठी हालचाली संजय राऊतांनी मातोश्रीवरील भेटीनंतर दिली माहिती

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावरून सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रिय निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हाती येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले. त्यातच समता पार्टीच्या एका …

Read More »

उध्दव ठाकरेंचे कारमध्ये उभे राहुन भाषण …भाजपा म्हणते कॉपी बहाद्दर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टीका केली

शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे अनेक ठिकाणी पक्षवाढीसाठी आपल्या कारने जात असत. तसेच त्या कारच्या बोनेटवर उभे राहून सभेला संबोधित करायचे. अगदी आज त्याचप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण सटकल्यानंतर हजारो शिवसैनिक कालपासून मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांना समर्थन देत आहेत. मात्र आज …

Read More »