पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणा-या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात …
Read More »ईडी कारवाईनंतर संजय राऊत यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र, वाचा पत्र ईडी कोठडीतूनच लिहिले पत्र
पत्रावाला चाळप्रकरणी ईडीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने कारवाई करत अटक केली. तसेच त्यांना विशेष न्यायालयानेही दुसऱ्यांदा ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ईडी कोठडीतूनच संजय राऊत यांनी काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिल्याची माहिती पुढे आली आहे. या पत्रात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी काँग्रेस …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली ‘या’ गोष्टीला वाढीव मुदत अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार
शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या हस्तांतरण (फ्री होल्ड) प्रक्रियेसाठी काही वेळा विलंब होतो हे लक्षात घेऊन अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या (कलेक्टर लँड) हस्तांतरण (फ्री होल्ड) जमिनीचा धारणाधिकार रुपांतरणाबाबत बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका, एकही झाड तोडायचे नाही महाविकास आघाडीच्या निर्णय बदलानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबईचे पर्यावरण राखण्याच्या उद्देशाने आणि भविष्यकाळातील मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडी सरकारला घालवून टाकत राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मविआ सरकारचा तो निर्णय रद्दबादल करत पुन्हा आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला. मात्र या विरोधात पर्यावरण प्रेमींनी …
Read More »राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे राष्ट्रवादी नव्हे, राष्ट्रद्रोहीच ‘राष्ट्रवादी’च्या तिरंगाविरोधी भूमिकेवर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशातील जनता उत्सव साजरा करत असताना या उत्साहात मिठाचा खडा टाकणाऱ्यांचा राष्ट्रद्वेषच यानिमित्ताने देशासमोर आला आहे. ‘हर घर तिरंगा’ हा एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी लोकांच्या प्रतिसादामुळे हा राष्ट्रभक्तीचा उत्सव ठरला असताना देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंग्यास फालतूगिरी म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आपली राष्ट्रद्रोही मानसिकता उघड …
Read More »दिपक केसरकर म्हणाले, नारायण राणेंनी आदित्य ठाकरे यांची बदनामी केली सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून साधला निशाणा
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले. मात्र सुरुवातीला बंडखोरीनंतर ४० आमदारांनी ठाकरे कुटुंबिय आणि मातोश्रीवर भाष्य करायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र मध्यंतरीच्या काळात दिपक केसरकर यांच्यासह अनेक बंडखोर आमदारांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका करण्यास सुरुवात केली. मात्र …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणे गुन्हा का ? दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, तरीही जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू
देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस …
Read More »प्रविण दरेकर यांचा मंत्री पदाचा पत्ता कट मुंबै बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा स्विकारली
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी भाजपामधील आमदारांबरोबरच शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडूनही मोठ्या प्रमाणावर लॉबींग करण्यात येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच जाहिर करत सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करता येणार नाही असे सूचक वक्तव्य केले. त्यातच संभावित मंत्र्यांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुधीर मुनगंटीवारांनी दिली नवी ताऱीख, वाचा कोण होणार मंत्री १५ ऑगस्टच्या अगोदर मंत्र्यांचा शपथविधी
राज्यात सत्तांतर झाल्यापासून बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्याकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने नेहमी तारखा जाहीर करण्यात येतात. त्यानुसार आजही केरसकर यांनी शनिवारी किंवा रविवारी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहिर केले. मात्र भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख दिली असून १५ ऑगस्टच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे …
Read More »केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी सातारच्या रणजीत मोरे यांची नियुक्ती मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे सुपूत्र आणि मेघालय उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रणजित वसंतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निमसोड येथील आहेत. त्यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण निमसोड येथे झाले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथून पूर्ण केले. तसेच त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya