Editor

पैसे मिळाले ना, मग पेट्रोल डिझेलवरील कर ५० टक्के कमी करा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

जीएसटी परताव्याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे बोटे दाखवून जनतेची दिशाभूल करत ठाकरे सरकार आपल्या आर्थिक नियोजनातील ढिसाळपणाचे प्रदर्शन घडवू लागले असून जीएसटीचा मे महिन्यापर्यंतचा संपूर्ण परतावा केंद्राकडून मिळालेला असल्याने आता आकड्यांचा फसवा खेळ न करता पेट्रोल आणि डिझेवलरील राज्याचे कर ५० टक्क्यांनी कमी करून जनतेला दिलेले वचन पूर्ण करा, अशी मागणी …

Read More »

सोनिया गांधीना आलेल्या ईडी नोटीसीवर मंत्री थोरात म्हणाले, राजकीय संस्थेप्रमाणे… संपूर्ण देशातील जनता सोनिया व राहुल गांधी यांच्या पाठीशी

देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे …

Read More »

नाशिकच्या गोंधळावर प्रश्न विचारताच छगन भुजबळांनीही उगारला माईक, पण… कृतीतून शास्त्रार्थ सभेतील गोंधळावर लगावला टोला

हनुमानाच्या जन्मस्थानावरून सध्या नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या पहिल्याच दिवशी कर्नाटकच्या गोविदानंद महाराज आणि महंत सुधीरदास पुजारी यांच्यात खटका उडाला. त्यामुळे सुधीरदास पुजारी यांनी एका चॅनेलचा बूमचा गोविंदानंद महाराजांवर उगारल्याचे चित्र पहायला मिळाले. या साऱ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांना एका पत्रकाराने …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, सगळी सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले असे सांगत राज्यातील जनतेसाठी जे जे आवश्यक असेल ते आपण करतच आलो आहे. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही अशी स्पष्ट कबुली मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

सोनिया गांधी, राहुल गांधीनाही ईडीची नोटीस; काँग्रेस म्हणते झुकेंगे ना डरेंगें नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोटीस ८ जूनला चौकशीला बोलावले

बिगर भाजपा सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि राजकिय नेत्यांना सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून नोटीस आणि धाडी टाकण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. आता एका प्रकरणात ईडीने थेट काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. …

Read More »

स्कायमेट म्हणते, भारतीय हवामान खात्याची “ती” माहिती चुकीची केरळात मान्सून दाखल नाहीच

वाढत्या उन्हाच्या काहिलीने संपूर्ण भारतीय त्रस्थ झालेले असताना कधी एकदा मान्सूनचे आगमन होते आणि वातावरणात बदल होवून दिलासा मिळतो याची वाट पहात असताना नुकतेच भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहिर केले. मात्र भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेली माहिती चुकीची असल्याचा दावा स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केली. त्यामुळे …

Read More »

मुंबईतील “हे” वार्ड झाले महिला आणि अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित २३६ पैकी ११८ आरक्षित जागांसाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत संपन्न

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी ११८ प्रभाग आरक्षित असून, यासाठीचे ‘आरक्षण निर्धारण’ व सोडत आज काढण्यात आली. वांद्रे (पश्चिम) परिसरात असणा-या रंगशारदा नाट्यगृह येथील विद्याधर गोखले सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम …

Read More »

३८९४ गिरणी कामगारांना १५ जूनपर्यंत घरे वाटप करा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची म्हाडाला सूचना

म्हाडाच्या लॉटरीतील लाभार्थी गिरणी कामगारांच्या ३८९४ तयार घरांचे देकारपत्रे १५ जूनपर्यंत देण्यात यावीत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी तात्काळ सुरू करावी अशा सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गिरणी कामगारांच्या घर वाटप व त्यांच्या पुनर्वसन संदर्भातील अडचणीं जाणून घेण्यासाठी विधानभवनात आयोजित बैठकीत डॉ. गोऱ्हे बोलत …

Read More »

परिचारीकांच्या आंदोलनाबाबत मंत्री अमित देशमुख यांचे मोठे विधान आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असून परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र …

Read More »

पडळकरांची पवारांवर खोचक टीका, त्यांना लेकीची अन् नातवाची काळजी… अहिल्यादेवींच्या जयंतीदिवशीच चौंडीत पवार विरूध्द पडळकर-खोत संघर्ष

त्यांचा बुरखा फाडण्यात आम्ही गेल्या दोन वर्षात यशस्वी झालो आहोत. त्यांना आता आपल्या लेकीची, नातवाची काळजी लागली आहे. पुढे त्यांना लोक जोडायचे आहेत. आम्ही या महापुरुषासाठी काहीतरी करत आहोत असं दाखवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हिंदू आहे हे म्हातारपणी सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मी हनुमान मंदिरात जाऊन माझ्या …

Read More »