Editor

संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, वेळ संपली नाही तर खऱ्या अर्थाने सुरू झाली आमचा सहावा उमेदवार ही निवडून येणार

राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या ६ जागांकरीता होणाऱ्या निवडणूकीवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एक शेवटची शिष्टाई म्हणून महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सुनिल केदार आणि शिवसेना नेते अनिल देसाई हे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याकरीता त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी गेले. मात्र भाजपा आणि महाविकास आघआडीच्या नेत्यांमध्ये सहाव्या …

Read More »

आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली “ही” माहिती भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम

राज्यसभा निवडणूकीतील संभावित घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत समझौता करण्याचा प्रयत्न केला. जवळपास महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर या बैठकीतील चर्चेची माहिती देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,भाजपा तीन जागा …

Read More »

राज्यसभा निवडणूकः मुदत संपली, कोण कोणाला कात्रजचा घाट दाखविणार ? भाजपा आणि महाविकास आघाडी आमने-सामने

राज्यसभा निवडणूकीसाठी आज अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आणि वेळेची मुदत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ होती. परंतु घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांची सागर या निवासस्थानी भेट घेतली. मात्र या भेटीत सर्वमान्य तोडगा निघाला नसल्याने अखेर भाजपा आणि महाविकास विकास आघाडी एकमेकांसमोर शड्डू ठोकल्याचे …

Read More »

सोनिया व राहुल गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्यासाठीच ईडीची नोटीस देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान: नाना पटोले

केंद्रातील भाजपाचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भिती दाखविली जात आहे. उदयपुर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे. परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष …

Read More »

मोठा निर्णयःआयटीआय विद्यार्थ्यांस मिळणार थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीला प्रवेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी …

Read More »

काँग्रेस पक्ष भाजपा आरएसएससारखा हुकूमशाह नाही प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या …

Read More »

मास्कबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला “हा” अल्टीमेटम निर्बंध नको तर शिस्त पाळा, मास्क वापरा

कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. …

Read More »

आरटीओच्या ड्रायव्हिंग लायसन्ससह “या” सेवा आता ऑनलाईन पारदर्शक सेवा देण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवा

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ११५ सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्ती (लायसन्स) चे नुतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) , वाहन-चालक अनुज्ञप्ती (लायसन्स) मधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी …

Read More »

राज ठाकरे पत्र लिहित म्हणाले, हा विषय मला संपवायचाय भोंग्यावरून मनसैनिक आणि सर्वसामान्य जनतेला पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना नव्याने ट्वीट करीत आदेश दिला आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या भोंग्या विषयी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. ते पत्र त्यांनी घरोघरी पोहोचवा असे सांगितले आहे. मनसेने मस्जिदीवरील भोंग्यांना हात घातल्यानंतर देशातल वातावरण चांगलच ढवळून निघालं आता हा विषय आपल्याला संपवायचा आहे. आपले विचार घरोघरी …

Read More »

गोपीचंद पडळकर यांचे आव्हान, स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा

नुकत्यात झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौंडीतील जयंती उत्सवावरून भाजपाचे आमदार गोपीचांद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच राजकिय नाट्य रंगले होते. तसेच राष्ट्रवादीचा चौंडीतील कार्यक्रम हा पुतण्याच्या लॉंचिंगसाठी होता असा गंभीर आरोपही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. यापार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आज एक व्हिडिओ जारी करत आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »