राज्यातील हजारो एसटी कर्मचारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेला एसटी विलगीकरणाचा अहवाल आज राज्य विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडत ते पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ रद्दबातल करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शासनाला चालविणे शक्य नाही. एसटीचे विलगीकरण शक्य नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून त्यांच्या मार्फत एसटी चालविली जाणार …
Read More »पटोलेंचे आवाहन, भाजपामुक्त लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा निलंगा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यातही हा ओघ असाच राहिल. लातूर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश घेवून लातूर जिल्हा भाजपमुक्त करण्यास सुरुवात केली असून भाजपमुक्तीचा हा लातूर पॅटर्न मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »राष्ट्रवादीचा ईडीला सवाल, मलिकांच्या आरोपपत्रात आकडे चुकलेच कसे? हसीना पारकर हिला ५५ नाही तर ५ लाख दिले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसीना पारकर हिला कुर्ला येथील जमिन खरेदी करताना ५५ लाख रूपये दिल्याचा उल्लेख करण्यात आला. परंतु ती चुक ईडीच्या लक्षात आल्यानंतर त्यात दुरूस्ती करत ५५ लाख नाही तर …
Read More »“नवाब मलिक सरकार हाय हाय ?” आणि भाजपाने केली चुकीची दुरूस्ती चुकलेल्या घोषणेनंतर केली सारवा सारव
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या काही दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉंडरींग प्रकरणी अटक केली. मात्र त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून अधिवेशनाचे कामकाज चालवू देणार नसल्याचा इशारा भाजपाने दिला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी मलिक …
Read More »‘मराठा, कुणबी’ समाजाच्या भविष्यकालीन योजनांसाठी सूचना पाठवा सारथी संस्थेचे नागरीकांना आवाहन
“मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी” (लक्षित गट) या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा …
Read More »मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य सरकारने घेतला “हा” मोठा निर्णय ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतीना पत्र
ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करत आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. परंतु तो अहवालही आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसींना राजकिय आरक्षण मिळणे आता पुन्हा दुरापास्त बनले. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …
Read More »विधानसभेत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून विरोधकांककडून गोंधळ गोंधळातच शासकीय कामकाज उरकले
जमिनीची खरेदी अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या व्यक्तींकडून केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे गोंधळात सरकारला कामकाज पुढे रेटावे लागले. दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तरी …
Read More »नवाब मलिकांना दिलासा नाहीचः ईडी कोठडीत वाढ ७ मार्च पर्यंत वाढविली
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी अंडरवर्ल्डशी संबधित आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींकडून जमिन खरेदी केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केली. याप्रकरणात त्यांना सुणावन्यात आलेली ईडी कोठडी आज ३ मार्च रोजी संपत आल्याने चौकशीसाठी आणखी काही दिवस त्यांना ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडी वकिलांनी केली. त्यानुसार त्यांना आणखी …
Read More »राज्यपालांच्या न केलेल्या भाषणात नेमके आहे काय? वाचा सविस्तर भाषण सविस्तर भाषण वाचकांसाठी आहे तसे
सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व राज्य विधानमंडळाचे सन्माननीय सदस्यहो, राज्य विधानमंडळाच्या, २०२२ या वर्षातील पहिल्या अधिवेशनात आपणा सर्वांचे स्वागत करताना, मला अतिशय आनंद होत आहे. 2. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान …
Read More »राज्यपालांच्या “त्या” कृतीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, केवळ भाजपाच्या… राज्यपालाकडून राष्ट्रगीताचा अवमान: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
भाजपा आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेली दुर्दैवी घटना आज घडलेली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हीही विरोधी पक्षात होतो. पण आम्ही कधीच सभागृहाचा अपमान केला नाही. राज्यपाल सभागृहात आले तेव्हा महाविकास …
Read More »
Marathi e-Batmya