Editor

मविआ सरकारकडून दडपशाही सुरु, पण पोलिसांनी बोलावल्यास परत जाणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकारची दडपशाही सुरू आहे. त्यातूनच भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. अशाच प्रकारे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका प्रकरणात माता रमाबाई आंबडेकर मार्ग पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपली सुमारे साडेतीन तास चौकशी केली. पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यानुसार आपण पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिस अधिकाऱ्यांच्या …

Read More »

संभाजी राजेंनी केले भुजबळांचे कौतुक, हेच शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनंतर खासदार संभाजी राजेंचे वक्तव्य

छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू …

Read More »

फडणवीस म्हणाले, संजय राऊतांना “तो” शब्द माहित आहे पण मी वापरणार नाही महाविकास आघाडी सरकारने वेश्यांच्या पैशातही डल्ला मारला

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असा टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित …

Read More »

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची राज ठाकरेंना विनंती

महाराष्ट्र पेटेल असं काही वक्तव्य करू नका अशी हात जोडून विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. आज राष्ट्रवादीच्या जनता दरबार उपक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड यांनी वरील विनंती केली. महाराष्ट्र शांत आहे… कुठेही क्लेश नाही… द्वेष दिसत नाही… सर्व …

Read More »

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष …

Read More »

डेहराडूनमधील ७८ वर्षिय महिलेने आपली संपत्ती केली राहुल गांधीच्या नावे भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मोठी घटना

देशातील प्रत्येक राज्यात बिगर भाजपा सरकारच्या विरोधात रान उठवून आपणचं कसे चांगले आणि हिंदूत्वावादी विचाराचे आहोत यासाठी भाजपाकडून जीवाचे रान करत साम, दंड आणि भेद नीतीचा वापर करण्यात येत आहे. परंतु भाजपाशासित उत्तराखंडमधील ७८ वर्षिय वयोवृध्द महिलेने आपली संपूर्ण मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची आणि त्याचा स्विकारही …

Read More »

गडकरी-राज भेटीनंतरही रावसाहेब दानवे म्हणतात, हे शक्य नाही भाजपा-मनसे युतीची शक्यता लावली फेटाळून

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मनसेच्या आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाच्या प्रचाराच्या मुद्यांवर आधारीत भाषण करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. त्याचे पडसाद काल रविवारी मोठ्या प्रमाणावर उमटल्यानंतर रात्रो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले तसेच या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या …

Read More »

नाना पटोलेंचा टोला, आता ईडी काय हजार पाचशे रूपयांची चौकशी करणार का? कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातील मतदारांनाच दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना या १७ पध्दतीच्या चाचण्या मोफतः वाचा यादी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ५ हजार रूपयापर्यंतच्या चाचण्या मोफत

मागील आठवड्यात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य हिताच्यादृष्टीने वयाची ४० ओलांडलेल्या आणि ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य चाचणी मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. या निर्णयानुसार ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी आरोग्य चाचणी …

Read More »

नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ पीएमएलए न्यायालयाने दिला निकाल

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना दिलेल्या कोठडीची मुदत संपत आल्याने नवाब मलिक यांना पीएमएलए न्यायालयात आज ईडीने हजर केले असता मलिक यांना १८ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईवर आक्षेप घेत त्या विरोधात मलिक यांनी हेबॅबिस कॉर्पस याचिकेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु न्यायालयाने …

Read More »