मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसनंतर शिवसेनेने दिला पहिल्यांदाच नवाब मलिकांना पाठिंबा मलिकांनी नीट कार्यक्रम सुरु केल्याने ते मागे गेलेत
औरंगाबाद-मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोपांवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मलिक एका चीडीतून या गोष्टी करत असल्याचे मत व्यक्त करत आता हे सगळं थाबायला हवं अशी भूमिका घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता अद्याप तरी काँग्रेस आणि शिवसेनेने नवाब मलिक यांच्याकडून करण्यात …
Read More »महाराष्ट्रातील दंगलीवर उत्तर प्रदेशातील निवडणूका जिंकण्याचा भाजपाचा डाव दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपाचे षडयंत्र !: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय …
Read More »दंगलीवरून भाजपाच्या माजी मंत्र्यांचे शरद पवारांबद्दल खळबळजनक विधान ज्या दंगली होतात त्या शरद पवारांच्या आशिर्वादाने- माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा आरोप
अमरावती-मुंबई: प्रतिनिधी भाजपाने पुकारलेल्या अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपाचे माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक विधान करत जेव्हा जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा अशा दंगली घडतात. अमरावती, नांदेडमध्ये ज्या दंगली होत आहेत त्या शरद पवार यांच्या आशिर्वादाने होत असल्याचा गंभीर आरोपही बोंडे यांनी केला. …
Read More »हिंसेला जबाबदार असणार्यांवर सरकारच्यावतीने कारवाई होणार वसीम रिझवीला मोकळीक दिल्याने देशातील वातावरण बिघडतंय ;तात्काळ कारवाई करण्यात यावी- नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी आंदोलन करणं हा अधिकार आहे, परंतु आंदोलनाला हिंसक वळण लागत असेल तर ते योग्य नाही. लोकांनी शांतता बाळगली पाहिजे असे सांगतानाच हिंसेला जबाबदार असणार्या लोकांवर सरकारच्यावतीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान वसीम रिझवी हे देशातील …
Read More »भाजपाच्या अमरावती बंदला हिंसक वळण: पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात जमावाकडून अनेक दुकानांच्या फलकांची, ठेल्यांची तोडफोड
अमरावती-मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ काल काहीजणांनी अमरावतीत मोर्चा काढत हिंसा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आज भाजपाच्यावतीने अमरावती बंदची घोषणा केली. मात्र आज सकाळपासूनच शहराच्या राजकमल चौकात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला आणि त्याने सुरुवातीला रस्त्यावरील ठेल्यांची नासधुस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजारपेठेत जावून दुकानांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. …
Read More »अनिल परब यांच्या घरासमोर उद्या आंदोलन: मात्र महामंडळाने १७ डेपोतून गाड्या सोडल्या आझाद मैदानावरचे ठिय्या आंदोलन सुरू
मुंबई: प्रतिनिधी मागील १५ दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आजही सुरुच असून उद्या परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर आणि आणि राज्यात एसटी डेपो समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर केली. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी भाजपा नेत्यांच्या …
Read More »राहुल गांधी म्हणाले, तर भाजपा, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी राहुलजी गांधी यांच्या ऑनलाईन संबोधनाने काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ
वर्धा: प्रतिनिधी देशात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेसची तर दुसरी आरएसएस, भाजपची. काँग्रेसची विचारधारा ही खूप जुनी विचारधारा असून ती सर्वांना जोडणारी आहे. तर आरएसएस व भाजपाची हिंदुत्वाची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी आहे असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केला. अखिल भारतीय …
Read More »एसटी कर्मचारी आमचेच…कधीच दुजाभावाने पाहिले नाही, पण भाजपाने… भाजपाच्या नेत्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात घुसखोरी आणि त्यांच्या चिथावणीखोर वक्तव्ये
मुंबई: प्रतिनिधी एसटी महामंडळाचे कर्मचारी आमचेच आहेत. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे दुजाभावाने कधीच पाहिले नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्याची सरकारची पूर्ण इच्छा आहे. पण भाजपाचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसत आहेत… दंगा करत आहेत… अर्वाच्च बोलत आहेत. या सर्व राजकीय गोष्टी होत असल्यामुळे त्याला राजकीय पद्धतीनेच उत्तर दिले जात असल्याचे राष्ट्रवादी …
Read More »गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानी पोहोचले संपत्ती ८१ अब्ज डॉलरवर समूह कंपन्यांचे मार्केट कॅप १० लाख कोटींच्या जवळ
मुंबई: प्रतिनिधी अदानी समूहाच्या कंपन्यांचे मार्केट कॅप वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचले आहे. समूहाच्या एकूण ६ सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ९.९१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. यामुळे समूहाचे मालक गौतम अदानी आता जगातील १४ व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. या कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीची बातमी १४ जून रोजी आली होती. ज्यामध्ये असे म्हटले होते की परदेशी गुंतवणूकदारांचा कोणताही मागमूस नाही आणि अदानी शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्व विदेशी कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. यानंतर या समूहाच्या सर्व शेअर्सच्या किमती प्रचंड घसरल्या होत्या. या घसरणीमुळे ३ जुलै रोजी समूहाचे एकूण मार्केट कॅप ७.०८ लाख …
Read More »
Marathi e-Batmya