Editor

अजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक

नाशिक: प्रतिनिधी राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकायदक असल्याचे कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने सांगितले असल्याने सावध रहा असे इशारा वजा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. नाशिकमधील आयोजित आमदार सरोज यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …

Read More »

पीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या कालावधीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलतीचा फायदा मिळणार असल्याचे असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्री पाटील …

Read More »

सफाई कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता स्वतंत्र कक्ष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. हाताने मैला उचलणा-या मृत सफाई कर्मचा-यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. …

Read More »

ऑलिंम्पिक-२०२० साठी महाराष्ट्रातील हे ८ जण देशाचे प्रतिनिधीत्व करणार राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी टोकीयो ऑलिंम्पिक – २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत, राज्य आणि देशासह माता-पित्यांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. टोकीयो ऑलिंम्पिक -२०२० चे आयोजन २३ जुलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुंबई : प्रतिनिधी शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या  हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी वर्गास देत राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. …

Read More »

राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर उपरोधिक टोलाही लगावला. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र …

Read More »

नव्या सांस्कृतिक धोरणासाठी तज्ञ समितीची लवकरच स्थापना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवीन धोरण आणण्यात येणार आहे. या नवीन धोरणाचे प्रारुप तयार करण्यासाठी तज्ञ समितीचे प्राधान्याने गठन करण्यात यावे अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक …

Read More »

फि भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर होणार ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून अनेक शाळांकडून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेच्या वर्गाला प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्याविरोधात पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करत कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला आज दिल्याची …

Read More »

डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत व्यक्त केल्या या भावना डॉक्टर्समुळे कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे झाले शक्य

मुंबई : प्रतिनिधी १ जुलै या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच  कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यवत केली. सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात …

Read More »

युनोतून परतलेले प्रविण परदेशी आता या विभागाचे अप्पर मुख्य सचिव ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जावून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रविण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र तेथूनही त्यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी राज्याच्या सेवेत राहण्याऐवजी युनोत प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे थेट अर्जही केला. त्यानुसार एक वर्षाच्या प्रतिनियुक्तीवर …

Read More »