Editor

कदरू आघाडी सरकारचा गोरगरीबांच्या विरोधातील खरा चेहरा पुन्हा एकदा उघड भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आणि राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील लोकांच्या उद्धाराचे आश्वासन देऊन निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील अनुसूचित जाती, भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्य रेषेखालील सुमारे अडीच लाख विद्यार्थिनींचा उपस्थिती भत्ता बंद केला आहे, दिवसाला केवळ १ रुपया दिला जाणारा …

Read More »

आदिवासी विभागाच्या वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना प्रवेश आदीवासी मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ८ वी ते १२ वी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाबाबत परिस्थिती पाहून आदिवासी विकास विभागाच्या वसतीगृहांमध्ये प्रवेश देण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी सांगितले. कोवीड 19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत टप्प्याटप्प्याने शाळा तसेच …

Read More »

संजय निरूपम, जर्नादन चांदूरकरांना थेट संसदीय मंडळात स्थान काँग्रेस अध्यक्षांनी दिली मान्यता

मुंबईः प्रतिनिधी राज्यात काँग्रेस पक्षांतर्गत थोडेसे बाजूला फेकले गेलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा मानाचे स्थान देत त्यांचे राजकिय पुर्नवसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेत तशा नावांची यादी दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींना पाठवून दिली. अखेर त्या यादीस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंजूरी दिली असून राज्याच्या सांसदीय मंडळात बाजूला …

Read More »

विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीवरून सत्ताधारी विरोधक आधीच भिडले सांसदीय कामकाज मंत्री परब आणि विरोधी पक्षनेते दरेकरांचे एकमेंकाविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

मुंबई: विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय अधिवेशन बैठकीचे नियोजन करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांची आज बैठक झाली. मात्र अधिवेशनाच्या कालावधीवरून बैठकीत एकमत न झाल्याने विरोधकांनी विधिमंडळ कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. तर सासंदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेत्यांचा हा आरोप खोडून …

Read More »

१० दिवसाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाकरीता सरकारने केली ही तयारी सांसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली माहिती

मुंबई : प्रतिनिधी सन २०२१ अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार १ मार्च २०२१ ते १० मार्च २०२१ पर्यंत विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार ८ मार्च रोजी राज्याचा २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. तसेच सभागृहात अधिवेशनासाठी …

Read More »

ग्रामीण भागात बांधकाम करायचाय मग या प्रमाणपत्राची गरज नाही बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नाही-ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक …

Read More »

“त्या” नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालास कोण जबाबदार? सिध्दार्थ महाविद्यालय कि मुंबई विद्यापीठ

मुंबईः प्रतिनिधी एलएलबी विभागाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परिक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहिर केला. मात्र एलएलबीच्या पाचव्या सेमिस्टरच्या तब्बल ३४ विद्यार्थ्यांना परिक्षा देवूनही त्यांना मुंबई विद्यापीठाने गैरहजर असल्याचे दाखवित नापास केले आहे. याबाबत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ आणि सिध्दार्थ कॉलेजच्या प्रिंसिपल संध्या डोके यांच्याकडे तक्रार केली. तरी यावर अद्याप कोणतेही …

Read More »

कोरोना: मुंबईत हजारापार तर राज्याची ९ हजाराजवळ, मृतकही वाढले ८ हजार ८०७ नवे बाधित, २ हजार ७७२ बरे झाले तर ८० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर मुंबईत हजारापार बाधितांची संख्या नोंदविण्यात आली असून आज १ हजार १६७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर ४ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यात मात्र आज बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ नोंदविण्यात आली असून राज्यात ८ हजार ८०७ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८० …

Read More »

पटोलेंचे आदेश, या महानगरपालिकेच्या निवडणूका स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा आढावा बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे आवाहन करत कल्याण डोंबिवली, वसई-विरार, ठाणे, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत वार्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून …

Read More »

मंत्री राठोड आले, आता कारभारही संभाळतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी १५ दिवसानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी बैठकीत कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. राठोड आता विभागाच्या दैंनदिन कामकाजाला सुरुवात करतील असे नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्री राठोड यांच्यावरू सध्या विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारवेर धरले …

Read More »