Editor

संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला सांस्कृतिक मंत्री देशमुख यांचे आश्वासन

लातूर : प्रतिनिधी समाज जागृती आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करणाऱ्या लोकलावंताचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील असे आश्वासन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री  तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहे. कोविड१९ पार्श्वभूमीवर तमाशा (लोकनाट्य) क्षेत्राला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. …

Read More »

कोरोना: सलग दुसऱ्या दिवशी २२ हजार रूग्ण तर बरे होण्याच्या प्रमाणात घट २२ हजार ५४३ नवे बाधित, ११ हजार ५४९ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग दुसऱ्यादिवशी २२ हजार ५४३ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या १० लाख ६० हजार ३०८ वर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ९० हजार ३४४ वर पोहोचल्याने लवकरच राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापार जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच …

Read More »

संरक्षणमंत्री राजनाथसिंह सोनु महाजनांना फोन कधी करणार ? माजी सैनिक सोनु महाजन यांना न्याय कधी मिळणार? सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा, प्रेम, आदर आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. त्यांच्यावर २०१६ साली हल्ला करण्यात आला त्याची दखलही फडणवीस सरकारने घेतली नाही, …

Read More »

मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या संवादातून जनतेची घोर निराशा भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादातून सामान्य जनतेच्या पदरात काहीच पडलेले नाही. कोरोनाला अटकाव कसा घालणार, मिशन बिगीन अगेनची नेमकी कशी अंमलबजावणी करणार, राज्याचे उद्योग चक्र गतिमान कसे करणार, याची उत्तरे मुख्यमंत्र्यांच्या संवादातून मिळाली नाहीत, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. राज्यात कोरोनाचे संकट अतिशय भीषण …

Read More »

आजी काळजी करू नका… दोन तीन दिवसात बर्‍या व्हाल; ९० वर्षांच्या आजीला दिला धीर कोरोना वॉर्डमध्ये जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांची केली विचारपूस

सांगली: प्रतिनिधी “आता कसं वाटतंय आजी …. काही काळजी करू नका… दोन – तीन दिवसात बर्‍या व्हाल…” असा धीराचा शब्द सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९० वर्षांच्या आजीला दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिली गुड न्युज तर मराठा समाजाला केले मोर्चे न काढण्याचे आवाहन भाजपाला मात्र इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आतापर्यत नियंत्रणात असलेली कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असून जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार दुसरी लाट येणार आहे का? कि आली आहे हे आताच सांगणे अवघड आहे. मात्र या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण महाराष्ट्रात चांगलाच वाढत आहे. त्यातच आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता पुन्हा आपल्यासमोर आला आहे. या …

Read More »

कोरोना: मुंबई-ठाणे, पुणे विभागात संख्या वाढ तर मराठवाड्यात कमी पण नागपूरात जास्त २२ हजार ०८४ नवे बाधित, १३ हजार ४८९ बरे झाले तर ३९१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि ठाणे मंडळात प्रत्येकी सरासरी १० हजार रूग्णांची वाढ झाली आहे. तर पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण आढळून येत असून मराठवाड्यात कमी तर विदर्भातील नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याप्रमाणे चांगलीच वाढताना दिसत आहे. मुंबई-ठाणे …

Read More »

ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी आता जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या विभागीय आयुक्तांना राखीव साठा करण्याचे निर्देश- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ५० ड्युरा सिलेंडर आणि २०० जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा …

Read More »

निवृत्त नौदल अधिकारी शर्मा मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन …

Read More »