शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करण्यासाठी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सभागृहात दाखल झाले तेव्हा अनेक राजदूतांनी सभात्याग करत त्यांच्या खुर्च्या रिकाम्या केल्या. गाझामधील लष्करी कारवाईमुळे इस्रायलला जागतिक पातळीवर एकटे पडावे लागत असल्याने हा सभात्याग करण्यात आला. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली की, …
Read More »उद्योग मंत्रालयाचे निवेदन, भारत-अमेरिका दरम्यान व्यापार चर्चा अमेरिकेत होणार तारखेचा उल्लेख मात्र निवेदनात नाही
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने या आठवड्यात न्यू यॉर्क भेटीदरम्यान अमेरिकन सरकारमधील अधिकाऱ्यांशी “रचनात्मक” बैठका घेतल्या, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. त्यात असेही म्हटले आहे की दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापार कराराच्या संभाव्य रूपरेषांवर देखील चर्चा केली. तथापि, करारासाठी औपचारिक वाटाघाटीची पुढील तारीख किंवा …
Read More »विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका, आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में… नवरात्रीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्याने केला डान्स
राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेतात पाणी घरा दारात पाणी संसार वाहुन गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात असताना तेथील जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचत आहेत, प्रशासनाला आणि राजकर्त्यांना याचं गांभिर्य नाही अशी घणाघाती …
Read More »एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलली, महिन्यानंतर होणार २८ सप्टेंबर ऐवजी ९ नोव्हेंबरला होणार परिक्षा
एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २८ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा ९ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे आणि हवामान खात्याने दिलेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस गेले पूरग्रस्तांसाठी मदत मागायला, येताना मात्र मेट्रो, पोलाद सिटी, जमीनीवर चर्चा पंतप्रधान मोदींची घेतली भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर
मराठवाडा प्रांतातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. तसेच त्यांची जनावरंही बुडून मरण पावली तर काही वाहुन गेली.तसेच अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यातच राज्याच्या तिजोरीत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. …
Read More »मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला पूरग्रस्त भागातील पशुधन हानीचा व सुरक्षिततेचा आढावा पूरग्रस्त भागात फिरती पशुवैद्यकीय पथके सक्रिय ठेवून तात्काळ सेवा द्या
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पशुधनाच्या झालेल्या हानीचा व त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महसूल विभागाशी समन्वय साधावा, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच अतिवृष्टी व पूरग्रस्त भागात जनावरांसाठी …
Read More »शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाण मालकाची जास्त काळजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे
महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, पीएम केअर फंडातून २० हजार कोटी महाराष्ट्राला द्या शेतकरीच आपला कणा…शेतकऱ्यांसाठी चार पाऊले पुढे येऊन सरकारने मदत करावी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. दौरा सुरू होण्याआधी जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकरी आपला कणा असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने चार पाऊले पुढे यावे असे आवाहन सरकारला केले आहे. जयंत पाटील पुढे म्हणाले …
Read More »आमदार रईस शेख यांची टीका, उर्दू अकादमीला निधी नाही पण जाहिरातीसाठी १० कोटी अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिले पत्र
राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्ण महोत्सवाच्या तीन दिवशीय कार्यक्रमाच्या प्रसिद्धीला अल्पसंख्यांक विभागाने मंजूर केलेल्या १० कोटी निधीवर समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी टीका केली. अकादमीला निधी देताना शासन हात आखडता घेते आणि प्रसिद्धीला मात्र उधळपट्टी करते, हा काय प्रकार आहे, अशी विचारणा आमदार शेख यांनी अल्पसंख्याक विकास …
Read More »
Marathi e-Batmya