Editor

जनसहभागामुळे महाराष्ट्र राज्य हागणदरी मुक्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत प्रतिपादन

नवी दिल्ली: प्रतिनिधी राज्य शासनाचा पुढाकार व जनतेच्या सक्रीय सहभागामुळे महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीणक्षेत्र पूर्णपणे हागणदारी मुक्त झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेत केले. २०१९ अखेर राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येकाला घर व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे उदिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय …

Read More »

भीम आर्मीचे नेते अँड . चंद्रशेखर आझाद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर महाराष्ट्रात पाच सभा घेणार

मुंबईः प्रतिनिधी सव्वा वर्षाच्या प्रदीर्घ कारावासातून मुक्त झालेले भीम आर्मी या संघटनेचे नेते ऍड चंद्रशेखर आझाद लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत .भीम आर्मी सामाजिक संघटना आणि अराजकीय संघटना असली तरी येत्या काळात किंगमेकरच्या भूमिका पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आझाद यांच्या महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. …

Read More »

झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आंदोलन महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर बसून मुक आंदोलन करणार

मुंबईः प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक,सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस २ ऑक्टोबरला राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन करत आहे. भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे …

Read More »

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही? विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. प्रभादेवी अर्थात जुन्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष झाल्याच्या अनुषंगाने …

Read More »

शासकिय कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख मिळणार जि.प., विद्यापीठ, अनुदानीत संस्थामधील कर्मचाऱ्यांनाही लागू होणार सरकारचा शासन निर्णय लागू

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारच्या कायद्यानुसार २००५ सालानंतर शासकिय सेवेत रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन योजनेऐवजी अंशदान पेन्शन योजना लागू होते. त्यामुळे सरकारी नोकरदारांना निवृत्तीवेतन तुटपुंजे मिळते. तसेच त्याचे अकाली निधन झाले तरी त्याच्या कुटुंबियांनाही फारसी सरकारी नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे शासकिय नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे कामाला लागून १० वर्षाच्या आत …

Read More »

मेक इन इंडिया- मेक इन महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी ‘मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र’ हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारा मंत्र असून यातून सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. स्टेनले स्टिल मर्चंट असोसिएशनच्या ६१ व्या वार्षिक बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, अतुल शहा …

Read More »

मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यावेत स्नेहालय संस्थेचा मधु दंडवते पुरस्कार स्विकारताना आ.कडू यांचे प्रतिपादन

अहमदनगर : प्रतिनिधी मातीतील सच्चे कार्यकर्तेच विधान सभेत यायला हवेत असे प्रतिपादन प्रहर संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी आज स्नेहालय येथे केले. सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणा-या महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थाना दरवर्षी स्नेहालय संस्थेद्वारे विविध पुरस्करानी गौरवले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा ,एम.आय.डी.सी., अहमदनगर येथे पार पडला. …

Read More »

भाजप प्रदेशमधील लोकशाही पध्दतीचा आमदार गोटे यांच्याकडून निषेध गिरीष महाजनांच्या नियुक्तीमुळे भाजपमधील धुसफुस बाहेर

मुंबईः प्रतिनिधी राज्यात सत्तेस्थानी असलेल्या भाजपमध्ये एकाधिरशाहीचा अनुभव सरकार पातळीवर सुरु आहे. मात्र त्याचे अनुकरण पक्षाच्या कामकाजातही पडताना दिसत असून धुळे महापालिकेच्या आगामी निवडणूकीच्या निमित्ताने स्थानिक नेतृत्वाकडे जबाबदारी सोपविण्याऐवजी बाहेरील व्यक्तीकडे अर्थात जळगांवचे आमदार तथा राज्याचे जलसंपदा गिरीष महाजन यांची प्रभारी पदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्याने धुळे शहरातील …

Read More »

यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार राम-लक्ष्मण यांना जाहीर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या …

Read More »