Editor

आर्थिक मंदी नाही तर भाजप नेत्याने स्वतः च्या कंपनीतील ४०० जणांना का काढले? राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यात सापडली आहे. तरीही केंद्र सरकार आणि भाजपाकडून देशात मंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग देशात मंदी नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना का काढले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी …

Read More »

मंत्रालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावली “उपहारगृह” ची माणूसकी…! १२ जणांनी एक हजारहून अधिक व्यक्तींच्या जेवणाची केली व्यवस्था

मुंबईः प्रतिनिधी मुंबईत कालपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा आज बुधवारी भलताच मुंबईकरांना फटका बसला. ऐरवी सकाळी सुरु झालेले मंत्रालय संध्याकाळी रिकामे होते. मात्र या अतिवृष्टीचा परिणाम शहरातील सर्वच वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱी-अधिकाऱ्यांना मंत्रालयातच थांबण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र या अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उपगृहातील कर्मचाऱ्यांच्या माणूसकीने धाव घेत या सर्वांची अल्प दरात …

Read More »

राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्र्यांच्या अनुपस्थितीत वन स्टॉप सेंटरचे उद्घाटन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ

मुंबई : प्रतिनिधी अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदे विषयक मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर आजपासून केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली असून दुसऱ्यांदा त्यांनी केंद्रीय …

Read More »

रात्रौ १.३० वाजता सापडली मंत्रालयात महिला मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे प्रशासकिय मुख्यालय असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी पोलिस दलास तैनात करण्यात आले आहे. मात्र याच सजग पोलिसांच्या तैनातीतही काही दिवसांपूर्वी माहिती चोरी (डेटा चोरी) चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रात्री १.३० वाजता एक अज्ञात महिला मंत्रालयात फिरताना आढळून आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा …

Read More »

आणि पावसाने मुंबई-उपनगर झाले धिमी मुसळधार पावसाने पाणी साचल्याने रेल्वे, रस्ते वाहतूकीची कोंडी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम राहिल्याने सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला येथील सखल भागांत पाणी साचलं आहे. रस्त्यांबरोबर अनेक रेल्वे ट्रँकवरही पाणी साचल्याने रेल्वेसहित रस्त्यावरील वाहतूकही धीमी झाल्याचे …

Read More »

वंचित आघाडी उज्ज्वला गँस वापरणाऱ्यांना १०० रू. अनुदान देणार आशा, अंगणवाढी सेविकांच्या मानधनात वाढ करणार असल्याची आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील उज्ज्वला गँस वापरणाऱ्या कुटुंबियाना एका गँस मागे १०० रूपयांचे अनुदान देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे जाहीर आश्वासन देत महाराष्ट्रात आज ६९ हजार आशा …

Read More »

आता वंचित अघाडीची सत्ता संपादन महारँली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जन आर्शीवाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची महाफर्दापाश यात्रा काढण्यात आल्या. आता त्याच धर्तीवर राज्यातील वंचित, बहुजन समाजाला आकृष्ट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन महारैली काढण्यात येणार असून या यात्रेची सुरुवात 8 सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. …

Read More »

फ्रूट वायनरी उद्योगासाठी फक्त रू.१ इतके नाममात्र उत्पादन शुल्क जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासूनची वाईन स्वस्त दरात उपलब्ध होणार

मुंबईः प्रतिनिधी फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. १ इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार …

Read More »

निवडणूक सर्व्हे म्हणजे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकेल हा भारतीय जनता पक्षाचा दावा फाजील आत्मविश्वास दर्शवत आहे. असे सर्व्हे मॅनेज करण्यात भाजपचा हातखंडा असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच असे सर्व्हे करून निवडणूकीचे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणुका …

Read More »

राज्यात गुंतवणूकीची गरज मात्र सरकारकडून मोदींच्या प्रतिमा संवर्धनासाठी काश्मीरात रिसॉर्ट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरीता अधिक गुंतवणुकीची गरज आहे. मात्र महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरीता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरीता काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेत जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »