मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्या घरी गोड बातमी येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. आज अखेर ती बातमी आलीच. कोठारेंचा चिरंजीव अमिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. उर्मिला बाळंत असल्याचं समजल्यापासून मिडियापासून आदिनाथ-उर्मिलाच्या चाहत्यांपर्यंत सर्वांचंच या बातमीकडे लक्ष लागलं होतं. आपल्याला कन्या …
Read More »हसविणारा भाऊ आता भीती दाखविणार ओढ मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत
मुंबई : प्रतिनिधी आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण फार कमी कलाकारांचं हे स्वप्न साकार होतं. काही कलाकार एकाच पठडीतील भूमिकांच्या जाळ्यात अडकून राहतात; परंतु काही भाग्यवान कलावंत मात्र पठडीबाज भूमिकांचे पाश तोडण्यात यशस्वी होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदमचं नाव आज …
Read More »१६ मार्चला लागणार वैभव-प्रार्थनाचं ‘व्हॅाट्सअप लग्न’ सिने रसिकांसाठी म्युझिकल रोमँटिक लव्हस्टोरी
मुंबई: प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील आजची सर्वात हॅाट जोडी कोणती असं जर कोणी विचारलं, तर वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे हे नाव अनाहुतपणे ओठांवर येतं. मराठी सिनेसृष्टीत इतरही अभिनेता-अभिनेत्रीच्या जोड्या हिट ठरत असल्या तरी वैभव-प्रार्थना या जोडी आनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना चांगलीच भावली आहे. याच कारणामुळे ही जोडी मराठी निर्माते-दिग्दर्शकांचीही ही फेव्हरेट …
Read More »रेटिंग वाढवल्याने आयटी शेअर्स उसळले २७ टक्के परतावा मिळण्याची शक्यता
नई दिल्लीः प्रतिनिधी जागतिक वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलेने आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवल्याने बुधवारी या कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी घेतली. इन्फोसिस आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स आता ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत. मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिस, टेक महिंद्रा, परसिस्टेंस, साइंट आणि एचसीएल टेक आदी आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढवून ओव्हरवेट श्रेणीमध्ये त्यांच्या …
Read More »अनाथांना मिळणार १ टक्का आरक्षण राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिल्याची मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी समाजातील कधी भीतीपोटी किंवा मुल नको अथवा अपघाती मृत्यू झालेल्या पाल्यांना अनाथश्रमात दिवस काढावे लागतात. मात्र ही मुल शिक्षण घेवून शासकिय नोकरीसाठी प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांना जात राक्षसाचा सामना करावा लागतो. त्यामुळे केवळ जात लिहीता येत नसल्याने अनेकवेळा नोकरीस पात्र ठरूनही त्यांना मिळत नसल्याने अनाथांना इतर जातींप्रमाणे …
Read More »तंत्रज्ञानामुळे कामकाजात पारदर्शकता, विश्वासार्हता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी गेल्या तीन वर्षात शासकिय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या कामकाज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आल्याची माहिती देत राज्यासमोरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरिमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे फिक्कीच्यावतीने आयोजित एम–टेक २०१८ डीजीटल …
Read More »विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला प्रतित्तुर भाजपच्या तिरंगा रॅलीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्र आणि राज्यातील सरकारची विकास कामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विरोधकांकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून संविधान बचाव रॅली काढण्यात येत आहे. मात्र विरोधकांच्या रॅलीला प्रतित्तुर म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा …
Read More »पश्चिम महाराष्ट्रातील रॉबीनहूड वाटेगांवकर काळाच्या पडद्या आड ९० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन
मुंबईः प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व्यक्तींकडून धनगर समाजासह मागासवर्गीय समाजावार अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेले बापू बिरू वाटेगांवकर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९० व्या वर्षी सांगलीत निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित त्यांच्याच नावाने अर्थात बापू बिरू वाटेगांवकर या नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला होता. बापू बिरु वाटेगावकर यांनी कृष्णा …
Read More »विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन अभ्यासू नेतृत्व गेल्याची राजकिय पक्षांमध्ये भावना
मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना.स फरांदे यांचे आज सकाळी निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार होते. या उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. फरांदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई …
Read More »सोने आयातमध्ये ७२ टक्के वाढ व्यापार तूटीतही वाढ
नवी दिल्लीः प्रतिनिधी डिसेंबरमध्ये देशाची सोन्याची आयात तब्बल ७२ टक्क्यांनी वाढून ३.३९ अब्ज डॉलरवर गेली आहे. मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या सोने आयातीमुळे या महिन्यात व्यापार तूटही वाढून ती १४.८८ अब्ज डॉलरवर पोचली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये १०.५५ अब्ज डॉलरची ही तूट होती. त्यात आणखी ४ अब्जची वाढ झाली आहे. देशाची निर्यात डिसेंबर महिन्यात १२ टक्क्यांनी वाढून २७ अब्ज डॉलरवर गेली आहे. तर एकूण आयातीत २१.१ टक्के वाढ झाली आहे. या महिन्यात ४१.९ अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. डिसेंबरमध्ये तेलाच्या आयातीचे बील ३५ टक्के वाढून १०.३५ अब्ज डॉलर झाले आहे. याअगोदरच्या महिन्यात ९.५५ अब्ज डॉलरचे तेल आयात करण्यात आले होते. दरम्यान, इंजिनिअरींग वस्तू आणि ऑयल प्रोडक्ट्सची निर्यात डिसेंबरमध्ये २५ टक्के वाढली आहे. तर तयार कपड्यांची निर्यात मात्र ८ टक्क्याने घटून १.३३ अब्ज डॉलरची राहिली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने तेल आयातीवरचा खर्च वाढल्याचे सरकारने म्हटले आहे. एप्रिल – डिसेंबर दरम्यान निर्यात वाढली एप्रिल – डिसेंबर २०१७ या कालावधीत निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत २१.०५ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत देशाची निर्यात २२३.५१२ अब्ज डॉलरची झाली आहे. मागील वर्षीच्या याचकालावधीत १९९.४६७ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या ९ महिन्यात आयात २१.७६ टक्के वाढून ३३८.३६९ अब्ज डॉलरवर पोचली आहे. Share on: WhatsApp
Read More »
Marathi e-Batmya