राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन
१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, २ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता तर २ ठिकाणी सत्तेत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला …
Read More »साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. प्रस्थापित नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी धाडून मतदारांनी विकासाला आणि नव्या चेहऱ्यांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मंत्री मकरंद पाटील यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला असून, महाबळेश्वरच्या तळदेव गटात शिवसेनेच्या (शिंदे गट) अजित …
Read More »मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा? मनिषा फडतरे यांच्या विजयावर आक्षेप घेत पुर्न मतमोजणी घेण्यात आली त्यानंतर भारती गोरे विजयी
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे …
Read More »राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने पुण्यात हलविले ८५ वर्षीय शरद पवार यांना बारामतीहून पुण्याच्या रूबी रूग्णालयात केले दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने दुपारीच बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलविण्यात आले. ८५ वर्षीय शरद पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी …
Read More »जेफ्री एपस्टीन महिला-मुलींना कशा पद्धतीने जाळ्यात ओढायचा जवळपास १ हजार मुलांना जाळ्यात ओढले
१४ वर्षीय जेनच्या (अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या फाईल्समध्ये ओळख पटवल्यानुसार) उन्हाळी शिबिरादरम्यान मिशिगनमध्ये आईस्क्रीम खाताना झालेल्या एका लहानशा गप्पांचे रूपांतर तिच्यासाठी अनेक वर्षांच्या अत्याचारात झाले, जेव्हा ब्रिटिश सोशलाइट घिसलेन मॅक्सवेल तिच्या यॉर्कशायर टेरियर कुत्र्यासोबत चालत आली आणि तिने स्वतःची ओळख करून देण्यासाठी थांबली. त्यांनी गप्पा मारायला सुरुवात केली आणि …
Read More »मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत
मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्र सुरक्षा कक्षात वेळेत जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मोहोळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली गेलेली …
Read More »संयुक्त किसान मोर्चाने मागितला पियुष गोयल यांचा राजीनामा भारत- अमेरिका व्यापारी करारावरून केली मागणी
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. सफरचंद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले की, कापसाच्या आयातीला कोणतीही सूट दिल्यास जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांसाठी ते विनाशकारी ठरेल. शनिवारी (७ फेब्रुवारी, …
Read More »जेफ्री एपस्टीन आणि दलाई लामा यांची भेट? कार्यालयाचा खुलासा जेफ्री एपस्टीनशी कधी भेटच कधी झाली नाही
दलाई लामा यांच्या कार्यालयाने रविवारी माध्यमांच्या काही विभागांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरलेल्या दाव्यांचे ठामपणे खंडन केले, ज्यात तिबेटी आध्यात्मिक नेत्याला दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी जोडण्याचा प्रयत्न केला जात होता. दलाई लामा यांच्या कार्यालयाने सांगितले की, तिबेटी नेत्याने एपस्टीनला कधीही भेटलेले नाही. ८ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात …
Read More »
Marathi e-Batmya