Editor

अतुल लोंढे यांचा सवाल, नारीवंदन आरक्षण २०२४ पासूनच लागू करावं अशी मागणी, का केलं नाही? पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर संसदेचे विशेष अधिवेशन

खऱ्या अर्थानं जर नारी वंदन हा विषय संवेदनशीलता आणि जिव्हाळ्याचा राहिला असता भाजपचा, तर २०२३ साली हे बील जेव्हा पास झालं, त्यावेळेस काँग्रेसनं आग्रह धरला होता की २०२४ पासूनच हे आरक्षण लागू करावं, तेव्हा लागू का नाही केलं? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी केला. पुढे बोलताना अतुल …

Read More »

नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित करा सर्वोच्च न्यायायलयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवर माडंली भूमिका

अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भातील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करावी तसेच   या संदर्भातील बदर समितीचा  संपूर्ण अहवाल त्वरित सार्वजनिक करावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्राद्वारे केली. नाना पटोले पुढे म्हणाले की, आरक्षण हा काही विशिष्ट व्यक्ती …

Read More »

उष्णतेच्या लाटापासून बचावासाठी असंघटीत कामगारांसाठी मार्गदर्शक सूचना महाराष्ट्रातील उच्च उष्णतेच्या जोखमीच्या शहरी जिल्ह्यांतील बाह्य (मैदानी) असंघटित कामगारांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना

उच्च उष्णतेच्या लाटा संभावित असणाऱ्या शहरी जिल्ह्यातील मैदानी असंघटीत कामगारांच्या संरक्षणाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १. उद्दिष्ट- उष्णतेच्या लाटांच्या काळात शहरी भागातील बाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र-विशिष्ट आणि अंमलात आणता येईल असा आराखडा उपलब्ध करून देणे. ही मानक कार्यपद्धती (एसओपी) एनडीएमए यांनी जारी केलेल्या राष्ट्रीय …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ६००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील …

Read More »

हसन मुश्रीफ यांचे आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा  सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क लसीकरण आणि जनजागृती मोहिमेला वेग आणि विशेष भर

जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना हे गृहविभागाचे अपयश

महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार …

Read More »

टीसीएसमध्ये नोकरी लावण्याच्या निमित्ताने तरूणीवर लैगिंक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग पोलिसांकडून सात जणांना अटक

एका ओळखीच्या व्यक्तीकडून नोकरीच्या ऑफरने याप्रकरणाची सुरुवात झाली. एका मोठ्या आयटी फर्मच्या चकचकीत काचेच्या टॉवर्समध्ये हे प्रकरण जबरदस्ती, धमक्या आणि कथित लैंगिक शोषणात बदलले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, एका तरुणीने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नाशिक शाखेतील तीन सहकाऱ्यांवर लैंगिक छळ, धमक्या आणि तिला इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा …

Read More »

दक्षिण भारतीय राज्ये डिलिमिटेशन प्रक्रियेमध्ये फारसे काही गमावणार नाहीत लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढण्याची शक्यता

डिलिमिलेट्शनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांच्या संख्येत दीडपट वाढ होईल आणि कोणत्याही राज्याची संसदेतील सध्याची राजकीय ताकद कमी होणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी (१५ एप्रिल २०२६) सांगितले. गुरुवारी (१६ एप्रिल) जेव्हा ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ आणि डिलिमिटेशन ‘सीमांकन विधेयक’ यावरील चर्चा संसदेत सुरू होईल, …

Read More »

३३ टक्के महिला आरक्षणानंतर लोकसभेची सदस्य संख्या ८५० पर्यंत वाढू शकते मतदारसंघ पुरनर्रचना प्रक्रियेत अनेक मतदारसंघ नव्याने वाढणार

केंद्र सरकारने लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या निर्णयामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला महिला आरक्षण कायदा लागू करण्याचा आणि नवीन मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जागाविस्ताराची रूपरेषा असलेले विधेयकाचा मसुदा खासदारांना देण्यात आला असून, सरकार संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात महत्त्वाच्या …

Read More »