रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक …
Read More »बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या अध्यक्षा बेगम खालिदा झिया यांचे मंगळवारी सकाळी ८० व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. बीएनपीने जारी केलेल्या निवेदनानुसार, खालिदा झिया यांचे ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात सकाळी ६ वाजता निधन झाले. त्या एका महिन्याहून अधिक काळ तेथे उपचार घेत होत्या. निवेदनात म्हटले …
Read More »ऱाज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या बेरजेच्या राजकारणानंतर पवार कुटुंबियाचे एकंत्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठीचे राजकारण
महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच एका राजकीय थरारनाट्यासारखे राहिले आहे; जेव्हा तुम्हाला वाटते की कथानक स्थिर झाले आहे, तेव्हा एक अनपेक्षित वळण सर्व काही उलथून टाकते. विशेषतः निवडणुकीचा हंगाम हा नाट्यमयता अधिकच वाढवतो. महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, निवडणुकीच्या चिंतेने असे काही साध्य केले आहे जे …
Read More »मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची यादी जाहिर राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही ६ उमेदवारांची यादी जाहिर
राज्यातील महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपत आलेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकिय पक्षांकडून आता त्यांच्या आघाड्या-बिघाड्या जाहिर करण्याची लगबग सुरु झाली आहे. तसेच प्रत्येक पक्षांकडून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आलेली असतानाच आता उमेदवारही जाहिर करण्यात येत आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची तर काँग्रेससोबत आघाडीत असलेल्या राष्ट्रीय …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लिम समाजासोबत बैठक नव्या समीकरणांची चर्चा, पिंपरीतील प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाणा
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरी येथील ‘हॉटेल नमस्कार’ येथे पत्रकार परिषद घेऊन स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट …
Read More »पीएसआय PSI_वयवाढ : काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा युवकांवर अन्याय आणि फसवणूक
पीएसआय PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या …
Read More »महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना लाभ ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ
वीज कनेक्शनच्या नावात बदलाच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्याची सुविधा महावितरणने सुरू केल्यानंतर राज्यातील वीज ग्राहकांना त्याचा मोठा लाभ झाला असून दोन महिन्यात ५८,१६७ ग्राहकांनी घरबसल्या नावात बदल (चेंज ऑफ नेम) करून घेतला. त्याचसोबत वीज ग्राहकांना मंजूर भार वाढवून घेण्यासाठी सुरू केलेल्या सुविधेचा १०,४२८ ग्राहकांना लाभ झाला आहे. जीवनसुलभतेसाठी (ईज ऑफ …
Read More »रामदास आठवले यांची मागणी, महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्या जागा वाटपातील चर्चेत झालेली रिपब्लिकन पक्षाची नाराजी मुख्यमंत्र्याकडे आठवले मांडणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६ जागा सोडाव्यात. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला सन्मानाने बोलाविले नाही आणि चर्चेत सहभागी करुन घेतले नाही. त्याबद्दल रिपब्लिकन कार्यकर्त्यामध्ये तीव्र नाराजी आहे. ही नाराजी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून उद्या मांडणार आहोत. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापुर्वी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडुन …
Read More »बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत शासकिय संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक
बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे. या प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी …
Read More »उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन ‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर …
Read More »
Marathi e-Batmya