Breaking News

पेरणीपूर्वी बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात …

Read More »

भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तरप्रदेश – बिहार रामभरोसे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर प्रेते …

Read More »

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या मागे सीबीआय पाठोपाठ आता ईडीही राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडीचे सत्र सुरु

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपावरून न्यायालयाने दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून आता देशमुखांची पुढील चौकशी होणार आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल …

Read More »

सरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर जिल्हा स्तरावर टास्क फोर्स-महिला व बालविकास विभागाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोवीड -19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. …

Read More »

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर राज्य सरकार करणार मोफत उपचार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा

जालना : प्रतिनिधी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात यणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. जालना येथे माध्यम प्रतिनिधींनीशी संवाद …

Read More »

रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांना टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लिहिताना किंवा बोलताना एखादी व्यक्ती इतकी उथळपणा कसा करू शकते, तेही न्यायालयात झालेल्या सुनावणीचे ‘प्रोसेडिंग’ न वाचता आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक भक्कम स्तंभ असताना असे सांगत रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी? असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना …

Read More »

आता फक्त याच कारणामुळे होणार सरकारी बदली….अन्यथा नाही राज्य सरकारकडून नवा आदेश जारी

मुंबई : प्रतिनिधी गतवर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या उशीराने करण्यात आल्या होत्या. तसेच यंदाच्या नव्या आर्थिक चालु वर्षात आपल्या इच्छेच्या, आवडत्या ठिकाणी किंवा रहिवासी असलेल्या जिल्ह्यात बदली व्हावी यासाठी प्रयत्न करण्यास अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नावर राज्य …

Read More »

महासत्तेचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी दुसऱ्या देशासमोर हात पसरविण्याची वेळ आणली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर …

Read More »

… नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पंतप्रधानांना टोला

मुंबई: प्रतिनिधी कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाहीय तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत …

Read More »

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी दोन दिवसांचे वेतन देणार विविध संघटनांनी सरकारला दिले निवेदन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविधस्तरातून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शासकिय आणि निमशासकिय अशा विविध महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिकांसह प्राधिकरण सेवेतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक ते दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्याच्या सेवेतील आयएएस आणि आयपीएस अधिकारीही आपले दोन …

Read More »