Breaking News

local train: लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाने अहवाल मागविला प्रत्येक स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्वरत सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात येत होती. त्यानुसार अखेर रेल्वे विभागाने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भातील प्रत्येक स्टेशनवरील लोहमार्ग पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार युनुसभाई शेख यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी निधन

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील राजकारणात काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस असो मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे. सोलापूर महापालिकेत पहिल्यांदा १९६९ साली नगरसेवक म्हणून …

Read More »

हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या वयाच्या ३४ व्या वर्षीचा जगाचा घेतला निरोप

मुंबई: प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीत आताशा कुठे बस्तान बसत असलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या बांद्रातील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत हा मुळचा बिहारमधील पाटण्याचा असून त्याचा जन्म …

Read More »

महाभारतात दुर्लक्षित राहीलेला “युयुस्तु” संवेदनशील कलावंत अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे विश्लेषण

महाभारत! भारतातील एक महत्वाचे महाकाव्य, सत्य की असत्य? रचलेले की घडलेले? माहीत नाही. पुराव्यावरून कदाचित होय घडलेले पण वास्तववादी विचार केला तर रचलेले. महाभारता बद्दल अनेक शंका कुशंका अनेकांच्या मनात आहेत. नाटकाच्या संदर्भात त्यातील व्यक्तिरेखांचे अनेक पैलू आपल्या पुढे येतात. महाभारतातील ‘व्यासाला’ आपण जर वसंत कानेटकर लिखित ‘ संगीत मस्त्यगंधा’ …

Read More »

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या केल्या..वाचा मदतीच्या निकषांमध्ये बदल, मासेमारांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या!

मुंबई : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेत कोकण दौर्‍याच्या अनुषंगाने तेथील अडचणींच्या १९ मागण्यांचे एक निवेदन त्यांना सादर केले. देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस कोकणाचा दौरा करून स्थानिकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणांना भेटी देऊन नुकसानीचा …

Read More »

कोरोना: २१ दिवसानंतर पुन्हा राज्यात ५१ हजार अॅक्टीव्ह रूग्ण आजही १०० हून अधिक मृत्यू तर ३ हजाराहून अधिक रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने एकूण रूग्णांच्या संख्येतून बरे होवून घरी गेलेल्या रूग्णांची संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार २४ मे २०२० रोजी राज्यात एकूण ५० हजार २३१ रूग्ण होते. आज पुन्हा २१ दिवसांनी ५० हजार अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पार करत …

Read More »

अंदाज खरा ठरला ! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस दुपारनंतर मान्सूनची हजेरी

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि महानगरात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी हवामान खात्याने १२ आणि १३ तारखेला मान्सूनच्या सरी मुंबई, पुणे येथे कोसळणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता. मुंबईत शहरातील बहुतांष भागात पावसाने दुपारी हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरींचा पाऊस पडला. मात्र नंतर …

Read More »

पहिला रूग्ण सापडण्याआधीच पंतप्रधानांना कोरोना संकट माहित होते केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोनाचा पहिला रूग्ण सापडण्याआधी या संसर्गजन्य आजाराची आणि यामुळे निर्माण होत असलेल्या संकटाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मादी यांना होती असा गौप्यस्फोट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला. जावडेकर हे ११ जून रोजी सौराष्ट्र आणि मध्य गुजरातमध्ये ऑनलाईन जनसंवाद रॅलीला संबोधित करत होते. तसेच या …

Read More »

शिशू वर्ग ते १२ वी पर्यंतच्या ८५% पालकांना मुलांच्या भविष्याची चिंता 'लीड स्कूल' सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई : प्रतिनिधी सध्या देशातील सर्वात मोठी ‘ऑनलाईन शाळा’ चालवत असलेल्या ‘लीड स्कूल’मार्फत नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, आजाराच्या साथीमुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे. या सर्वेक्षणातून असे निष्पन्न झाले आहे की, कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या …

Read More »

आता कोरोना चाचणी २२०० रूपयांत होणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर आकारला जाणार असून रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे जाहीर केले. …

Read More »