Breaking News

भारतातील ९०% कफ सिरपमध्ये त्रुटी कफ सिरफने लहान मुलांच्या मृत्यूमध्ये वाढ

Medical Expense

भारताच्या औषध नियामकाने देशातील जवळपास ९०% कफ सिरप उत्पादकांची तपासणी केली आहे आणि त्यात अनुपालनातील त्रुटी आढळल्या आहेत, असे त्यांच्या प्रमुखांनी सोमवारी (२३ जानेवारी २०२६) सांगितले. भारतात बनवलेल्या सिरपचा देशात आणि परदेशात मुलांच्या मृत्यूशी संबंध असल्याचे आढळल्यानंतर वाढत्या तपासणी दरम्यान. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये २४ मुलांच्या मृत्यूशी जोडलेल्या डायथिलीन ग्लायकोलने दूषित …

Read More »

भावविवश रोहित पवार म्हणाले, दादांची वर भेट झाल्यावर हे बटण लावेन, तोपर्यंत दादांच्या जाण्याने राजकारणातील मिश्किल पणा गेला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना आज अनेक नेते भावूक झाले. यात अजित पवारांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित यांना अजित पवारांच्या आठवणी सांगताना आज सभागृहात अश्रू अनावर झाले. यावेळी रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची भावुक, ‘मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’ शोकप्रस्तावा दरम्यान व्यक्त केली भावना

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे भेदभाव आणि द्वेषाच्या वातावरणात सौंदळा गावाने एकता, समता आणि बंधुत्वाचा संदेश दिला

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे …

Read More »

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून, समान वेतन, कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करा एआय अॅग्री २०२६ परिषदेत तज्ञांची शिफारस

शाश्वत शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभावी ठरत असतानाच, या तंत्रज्ञानात लिंग-संवेदनशीलता जपणे अत्यावश्यक आहे. महिलांना कृषी नवोपक्रमात समान भागीदार म्हणून मान्यता दिली पाहिजे.महिलांची डिजिटल साक्षरता वाढवली पाहिजे. “शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करण्याची, समान वेतन सुनिश्चित करण्याची आणि महिलांसाठी अनुकूल कर्ज व विस्तार सेवा उपलब्ध करून देण्याची शिफारस करावी, असे मत नामवंत …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

राज्यपाल यांची ग्वाही, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर शासनाचा भर मुलभूत सुविधा, सीमावाद, उद्योग, शेती, शिक्षण व सांस्कृतिक वारसा संवर्धनापर्यंत शासनाचा व्यापक दृष्टीकोन

राज्याची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ५ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत वाढविण्यासाठी राज्य शासन कृतिशिल आहे. पायाभूत सुविधा, गुंतवणूक, आणि जनकल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या विधेयकांवर विधीमंडळ सदस्यांनी विधायक चर्चा करावी, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केले. राज्य विधानमंडळाच्या २०२६ या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची सुरूवात राज्यपाल अभिभाषणाद्वारे झाली, त्यावेळी राज्यपाल देवव्रत बोलत होते. विधानमंडळात …

Read More »

उद्धव ठाकरे यांची भावना, अजित दादा सारखा उत्तम, दिलदार मित्र गमावला अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन, ‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’ स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार

साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे अजित पवार अपघात प्रकरणी आणि नरहरी झिरवळ प्रकरणी भाष्य पवार कुटुंबियांना त्रास होईल असे कोणी करू नये आणि नरहरी झिरवळ यांच्या विरोधात अद्याप काहीही नाही

अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पैसे घेण्याचा जो काही प्रकार झाला. त्यामध्ये अद्याप तरी नरहरी झिरवळ …

Read More »