बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणः १३ आरोपींना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मकोका न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयाने (मकोका) सोमवारी १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेने प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर आत्तापर्यंत २६ जणांना अटक केली असून ज्यामध्ये कथित मुख्य आरोपी शिवकुमार गौतमचा समावेश आहे. पोलिसांनी ३० नोव्हेंबर रोजी सर्व २६ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातर्गंत (मकोका) गुन्हा दाखल केला. एकूण २६ आरोपींपैकी १३ आरोपींना मकोका न्यायालयात हजर केले गुन्ह्याशी संबंधित आर्थिक बाबींच्याअनुषंगाने तपास करणे आवश्यक असल्याचा दावा करून पोलिसांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली.
त्यांची मागणी मान्य़ करून सर्व १३ आरोपींना न्यायालयाने १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अटकेत असलेले अन्य आरोपीही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल आणि शुभम लोणकर या गुन्ह्यात वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित केले आहे.

काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रेश केलेल्या वांद्रे येथील आमदार बाबा सिद्धिकी यांची (६६) १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे (पूर्व) भागात मुलगा झीशानच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.

About Editor

Check Also

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय, भोजशाळा-कमल मौलाना मशिद परिसर हे तर सरस्वतीचे मंदीर मुस्लिम समाजाला प्रार्थना करण्याची परवानगी देणारा आदेश रद्द करण्याचा निर्णय

विवादित धार्मिक स्थळांवर महत्त्वपूर्ण परिणाम करू शकणाऱ्या एका निकालात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी धार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *