कौटुंबिक न्यायालयाचा धनंजय मुंडे यांना झटका, करूणा मुंडे यांना पोटगी मंजूर प्रति महिना २ लाख रूपये देखभाल भत्ता आणि मुलीच्या लग्नापर्यंत ७५ हजार रूपये देण्याचे आदेश

सध्या राज्यातील वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या कायदेशीर लढाईत त्यांच्या घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मा यांना कौटुंबक न्यायालयाने मोठा दिलासा देत धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणून दर महा २ लाख रूपये देखभाल भत्ता आणि मुलीचे लग्न होईपर्यंत दरमहा ७५ हजार रूपये मुलीला देण्याचा महत्वपूर्ण आदेश कौटुंबिक न्यायालयाने आज दिला. तसेच कौटुंबिक न्यायालयाने करूणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून मान्यता दिली. त्याचबरोबर न्यायालयाने तिचा दावा अंशतः मान्य केला.

कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशानंतर करुणा शर्मा म्हणाल्या की, मी धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे. मला त्यांच्या विरोधात लढत असलेल्या कायदेशीर लढाईत विजय मिळाला. मी गेल्या तीन वर्षांपासून एकटीच लढत आहे, माझ्याकडे पैसे नव्हते, मी माझे सर्व दागिने विकले आणि लढताना माझी गाडीही विकली. मी सात महिन्यांपासून माझे भाडे दिलेले नाही. करुणा शर्मा यांनी दावा केला होता की ती धनंजय मुंडे यांची पत्नी आहे. करुणा शर्मा ही धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे हे न्यायालयाने मान्य केले.

पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, हा लढा अनेक वर्षांपासून सुरू होता आणि आता अखेर मला त्यात यश मिळाले आहे. न्यायालयाने मला पहिली पत्नी मान्यता दिली आहे. धनंजय मुंडे यांचे वकीलांनी मी धनंजय मुंडे यांची पत्नी नाही आणि त्यांना पोटगी देऊ नये असे म्हणत न्यायालयात बाजू मांडली. पण आज न्यायालयाने मला पहिली पत्नी म्हणून मान्यता देत मला न्याय दिल्याचे सांगितले.

करूणा शर्मा पुढे बोलताना म्हणाल्या की, १९९६ पासून आजपर्यंत आम्ही एकत्र आहोत, माझ्यावर झालेला हिंसाचार हा एक वेगळाच प्रसंग होता. न्यायालयाने हिंसाचाराचा अवलंब करू नये असे आदेश दिले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात मला मारहाण करण्यात आली, माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. माझ्या घराच्या खाली पोलिस रहात होते. भीतीमुळे मी मुंबई सोडली. मला भीती वाटत होती की पोलिस कोणत्याही क्षणी येऊन मला घेऊन जातील. म्हणून मी मुंबई सोडली आणि बीडमध्ये राहू लागलो. आता मी बीडमध्ये सुरक्षित आहे. मी दर आठवड्याला मुंबईला येते. ही लढाई माझी आहे. पण मुलांना याची किंमत मोजावी लागत आहे. माझ्या नवऱ्याला हे समजत नाही.

शेवटी बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या की, पण न्यायालयाने मला त्याची पत्नी म्हणून मान्यता दिली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत नाही. मी उच्च न्यायालयात जाणार आहे. मला पोटगी म्हणून १५ लाख रुपये हवे आहेत. घराचे भाडे १ लाख ७० हजार रुपये आहे. हे भाडे दिले जात नाही. देखभालीचा खर्च दरमहा ३० हजार आहे. मुलगा घरी बेरोजगार आहे. २ लाख रुपयांच्या देखभाल भत्त्याचे काय होणार, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *