रणबीर कपूर चित्रपटांमधून घेणार ब्रेक ? या कारणामुळे रणबीर कपूर चित्रपटातून घेणार मोठा ब्रेक

अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला अभिनेता आहे. अ‍ॅनिमल हा चित्रपट रणबीर कपूर याचा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर हा दिसतोय. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. रणबीर कपूर याला काही दिवसांपूर्वी ईडीने समन्स पाठवला. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रणबीर कपूर हा काही मोठे खुलासे करताना दिसतोय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रणबीर कपूर याने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. रणबीर कपूर याने स्पष्ट केले की, तो आता चित्रपटांमधून ब्रेक घेणार आहे. रणबीर कपूर हा सहा महिन्यासाठी ब्रेकवर जाणार आहे. याबद्दल बोलताना रणबीर कपूर हा म्हणाला की, मी पुढील सहा महिने हे फक्त आणि फक्त माझी मुलगी राहा हिला देणार आहे.

पुढे तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय की, अ‍ॅनिमल रिलीज झाल्यानंतर मी सहा महिने राहा हिच्यासोबत राहणार आहे. प्रामाणिकपणे सांगतो की, राहा हिला जन्मानंतर मी फार जास्त काही वेळ देऊ शकलो नाहीये, कारण सतत चित्रपट आणि शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तिला वेळ देणे शक्य झाले नाही. म्हणून पुढील सहा महिने माझे हे राहा हिच्यासाठी असणार आहेत असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हंटल आहे.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *