अर्थविषयक

नव्याने कर्ज घेणाऱ्यासाठी एसबीआयकडून नव्या वर्षाची भेट कर्जावरील व्याजदरात कपात

मुंबईः प्रतिनिधी नव्या वर्षात नागरीकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने कर्जधारकांसाठी खास भेट आणली आहे. या भेटीच्या माध्यमातून कर्जासाठी ईएमआय घटणार आहे. एसबीआयने आपला कर्जाचा आधार दर (बेस रेट) ०.३० टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज .३० टक्क्याने स्वस्त …

Read More »

कार घ्यायचीय ? भरा फक्त मासिक पाच हजार बँकांची स्वस्त कार योजना

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक मध्यमवर्गीयांचे स्वत:च्या मालकीची कार घेण्याचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरण्याचे स्थिती जवळ आली असून फक्त ५ हजार रूपयांच्या मासिक ईएमआयवर कार घेणे सोपे झाले आहे. सद्या बाजारात मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या अनेक कार आहेत. यासाठी फक्त १ ते २ लाख रुपये डाऊन पेमेंट करून मासिक ५ हजार रूपयांच्या …

Read More »

कंपन्या आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी सरते वर्ष अच्छे वर्ष वर्षभरात कंपन्याचे भागभांडवल ४५ लाख ५० हजार कोटींनी वाढले

मुंबईः नवनाथ भोसले भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी २०१७ हे वर्ष खास गेले आहे. या वर्षी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल ४५.५ लाख कोटी रुपये वाढली आहे. अनेक कंपन्यांनी छप्पर फाडके परतावा दिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. सरत्या वर्षात सेन्सेक्स आणि निफ्टीने २८ टक्क्यांनी जोरदार वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर मुंबई शेअऱ बाजारातील लिस्टेड (नोंदणीकृत) …

Read More »

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला. सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला …

Read More »

बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली. फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने …

Read More »

सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी केले मालामाल ८३ टक्क्यांपर्यंत मिळाला परतावा

मुंबईः नवनाथ भोसले म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच चांगले गेले अाहे. काही फंडांनी तब्बल ५० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. चांगला परतावा मिळाल्यामुळे संपूर्ण वर्षभर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडाची संपत्ती वाढून २२.७३ लाख कोटी रुपयांवर गेली. तर नवीन खात्यांची …

Read More »

परकिय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून काढता पाय २३ डिसेंबर पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपये काढले

नवी दिल्ली : प्रतिनिधी देशाची वित्तीय तूट वाढल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ७ हजार ३०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये ८ महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये …

Read More »

जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होणार उद्योगपती मुकेश अंबानी यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. …

Read More »

६ महिन्यात पुन्हा राज्य सरकारकडून १ हजार कोटीचे कर्जरोखे विक्रीला दहा वर्षे मुदतीची ७५० आणि सहा वर्षे मुदतीच्या २५० कोटींच्या रोख्यांची विक्री सुरु

मुंबई : प्रतिनिधी राज्यात होत असलेली विकास कामे, तसेच विविध योजना यांच्यावरील वाढता खर्च आणि त्यातच प्रशासनासह इतर गोष्टींवर होणारा खर्च मात्र जमा होणारी तुटपुंजी महसूली उत्पन्न यातून खर्च भागविणे राज्य सरकारला दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा महिन्यात पु्न्हा एकदा एक हजार …

Read More »