राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहिर

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावर बैठक घेत. मुंबई मधील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे आढावा बैठकीत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणीची घोषणा केली. सर्व घटकांना सामावून घेत सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी आम्ही घोषित केली असून आगामी काळात आणखी बऱ्याच मंडळींचा समावेश हा मुंबई कार्यकारणी मध्ये असेल असे मत देखील त्यांनी आज व्यक्त केले…

मुंबईत झालेला आढावा बैठकीत बोलताना ते म्हणाले की आज आपण जवळपास ७३ लोकांची कार्यकारीणी घोषित करीत असलो तरी कार्यकारणीसाठी किंवा अजित दादांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. टप्प्याटप्प्याने आपण सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करत मुंबई कार्यकरणी मध्ये आणखी बऱ्याच लोकांचा समावेश करणार आहोत.

आज घोषित झालेल्या कार्यकारणी मध्ये एकूण १५ उपाध्यक्ष १९ सरचिटणीस ३७ सचिव ६ चिटणीसांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुंबई ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी बबन मदने यांची देखील निवड करण्यात आली. यावेळी बोलताना मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ म्हणाले की मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ७ जानेवारी २०२४ रोजी षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अजित दादांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा मेळावा होत आहे मला विश्वास आहे या मेळाव्यामध्ये काही हजारो कार्यकर्ते सहभागी होतील.
आतापर्यंत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अत्यंत कमी कालावधीत २ कार्याध्यक्ष, २ महिला कार्याध्यक्ष , १ युवक अध्यक्ष , ६ जिल्हाध्यक्ष, ३६ तालुकाध्यक्ष, ६ महिला जिल्हाध्यक्ष, ६ जिल्हाध्यक्ष, १९० वॉर्ड अध्यक्षांची निवड केलेली आहे. आगामी काळात महिला कार्यकारिणी आणि युवक कार्यकारिणी यांची देखील घोषणा करून महिला आणि युवकांना देखील समान संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील समीर भुजबळ यांनी दिली.

मुंबई षण्मुखानंद सभागृह येथे होणाऱ्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि मुंबईचे प्रभारी छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे. या संवाद मेळाव्याला पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांनी केले.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची माहिती, भिवंडी शहराच्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळे दूर करणार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचेही आश्वासन

अमृत अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भिवंडी- निजामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी भाडेतत्त्वावर जागा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *