Breaking News

मुंबई

मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या करमाफी आश्वासनाचे काय झाले ? शिवसेना आमदारांची नगरविकास विभागाला विचारणा

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणूकीच्या कालावधीत 500 चौरस फुट क्षेत्रफळाच्या सदनिकेत राहणाऱ्या मुंबईकरांना मालमत्ता करात माफी देण्याचे आश्वासन सत्ताधारी शिवसेना व भाजपने दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईकरांचे मन जिंकून घेण्यासाठी विधानसभेत आश्वासन दिले. परंतु त्यास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी मुंबईकरांना करमाफी देण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने …

Read More »

मुंबईतील सीसीटीव्ही डायल १०० शी जोडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह डायल १०० प्रकल्पाचे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच या प्रकल्पासाठी येणाऱ्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार आहे. मुंबई …

Read More »

दुधात भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई मध्ये रोज लाखो लिटर दुधाची विक्री होते. सणासुदीच्या काळात ग्राहकांना भेसळ युक्त दूध घ्यावे लागू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत येणाऱ्या दुधाची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. काल झालेल्या मोहिमेत सुमारे साडे तीन लाख लिटर दूध सील केले गेले तर किमान २० …

Read More »

धारावीचा पुनर्विकास आता खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा देत हा प्रकल्प खाजगी-सार्वजनिक पध्दतीने राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली. तसेच त्यासाठी विशेष हेतू कंपनी (SPV) मॉडेल राबव‍िण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मॉडेलमध्ये मुख्य भागीदाराच्या ८० टक्के समभागाबरोबरच शासनाचा २० टक्के समभागासह सक्रीय …

Read More »

मंत्रालयात सरकारी कर्मचाऱ्याने केला आत्महत्त्येचा प्रयत्न पोलिसांनी संबधित इसमास रूग्णालयात केले दाखल

मुंबईः प्रतिनिधी विविध स्वरूपांच्या आरोपात तथ्य आढळल्याने सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आलेल्या दिलीप सोनवणे नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोनवणे मंत्रालयात उद्योग, कामगार आणि ऊर्जा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. स्टेशनरी, पंखे आदी सरकारी साहित्य विकणे, वारंवार गैरहजर राहणे अशा …

Read More »

पुणे आणि नाशिकच्या रेल्वे प्रवासात मिळणार वाचायला पुस्तके डेक्कन क्वीन, पंचवटी एक्सप्रेसमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सचा मंत्री तावडेंचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षांत या दिवसाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यंदाच्या वर्षापासून रेल्वेमध्ये लायब्ररी ऑन व्हिल्सची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना सुरु करण्यात येत …

Read More »

खेळाच्या मैदानावरील दांडीया संकटात क्रिडा विभागाला भूमिका मांडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरात मुलांसाठी खेळाची मैदाने मोठ्या मुश्किलीने उपलब्ध होत असताना नवरात्रोत्सवाचे निमित्त पुढे करत राज्य सरकारने ही मैदाने दांडियासाठी उपलब्ध करून देण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे मुलांवर खेळापासून वंचित राहण्याची पाळी आहे. या धोरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार विनायक सानप यांनी जनहित याचिका दाखल केली असून क्रिडा विभागाला …

Read More »

झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

म्हाडा, एसआरए इमारतींच्या पुर्नविकासासाठी आता ५१ टक्क्याची अट मुंबईसाठीच्या सारभूत स्वरुपाच्या फेरबदलांनाही राज्य सरकारची मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी सुधारित विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत 33 (5), 33 (7), 33 (10) या नियमानुसार विकसित करावयाच्या प्रकरणांत 51 टक्के संमतीची अट समाविष्ट केली आहे. जेणेकरुन म्हाडाच्या जुन्या इमारती, उपकर प्राप्त इमारती, झोपडपट्ट्या यांचा पुनर्विकास सहजतेने होऊ शकेल. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. खाजगी अनआरक्षित जागांवर संक्रमण शिबीर (Transit camp) उभारण्याची तरतूद केली असून …

Read More »

प्रकल्प अर्धवट सोडणाऱ्या विकासकांचे प्रकल्प म्हाडाने ताब्यात घ्यावे आमदार समितीची राज्य सरकारला शिफारस

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर व उपनगरातील म्हाडा इमारतींच्या पुर्नविकासाचे अनेक प्रकल्प सध्या रखडलेल्या अवस्थेत आहेत. तर या अनेक प्रकल्प विकासकांनी असेच सोडून दिलेले असल्याने विकासकांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प म्हाडाने ताब्यात घेवून त्याचा पुर्नविकास करावा अशी शिफारस मुंबई शहरातील पुर्नविकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या आमदार …

Read More »