मुंबई

राज्य सरकारने मंजूरी देवूनही प्रधान सचिवांचा मात्र विरोध पुणे विद्यापीठास पाली भवन उभारण्यासाठी निधी देण्यास नकार

मुंबई: प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम राबविले होते.त्याचाच एक भाग म्हणून पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाली भवन उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकार मधील सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतला होता. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या असतानाही …

Read More »

गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेत मुंबई पोलिस आयुक्त पदावरून झालेली बदली रद्द करावी आणि गृहमंत्री देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस …

Read More »

गर्दीच्या ठिकाणी अॅंन्टीजेन चाचणी कराच ! अन्यथा कारवाईला सामोरे जा मुंबई महापालिकेकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसात मुंबई शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३ हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला थोपविण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अँन्टीजेन कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देत चाचणीस नकार देणाऱ्या नागरीकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने सर्व वार्ड अधिकाऱ्यांना दिले. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांच्या …

Read More »

या कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना

Mantralay

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज …

Read More »

कोरोनाच्या काळात अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेचा अट्टाहास का? शिधावाटप संघटना आक्रमक

मुंबईः प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई / ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्याबाजूला मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बोगस शिधा पत्रकधारकांना शोधण्यासाठी नव्याने नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. परंतु केंद्र सरकारची वन नेशन वन कार्ड हे अभियान राबविले जात असताना आणि कोरोनाबाधितांची …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी अॅटालिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळून आल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत होते. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाल्यानंतर मुंबईच्या …

Read More »

राज्य सरकारमुळे म्हाडा बनली दात व नखे काढलेला वाघ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ८ कलमी अधिकाराचे विभागाला पत्र

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने म्हाडाची स्थापना केली. तसेच म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरांचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी यापूर्वीच्या सरकारांनी म्हाडाला स्वायत्त बनविण्यासाठी अनेक अधिकार दिले. मात्र आता महाविकास आघाडी सरकारला म्हाडाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी यासाठी म्हाडाचे जवळपास सर्वच महत्वाचे …

Read More »

सचिन वाझेंना मिळाली १० दिवसांची कोठडी एनआयए न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळेच वळण लागलं. त्यामुळे याप्रकरणातील प्रमुख तपासकर्त्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मध्यरात्री एनआयएच्या पथकाने अटक करत एनआयएच्या न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने वाझे यांना कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोठडी …

Read More »

चाकरमान्यानों, शिमग्यासाठी कोकणात जाताय तर हे वाचा ! रत्नागिरी जिल्हाधिक्यांकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सवानंतर कोकणातील शिमगा अर्थात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आता या शिमगा सणावर मार्गदर्शक तत्वांची संक्रात आली असून हा सण साजरा करण्याच्या अनुशंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केली असून रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबतचे आदेश लवकरच जाहिर करण्यात येणार …

Read More »

न्यायालयाचा निर्णय: आरोपी देणार मृतकाच्या वारसाला ११ लाखाची नुकसान भरपाई दिंडोशी न्यायालयाचा निकाल

मुंबई: विशेष प्रतिनिधी कांदिवली येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेबरोबर ११ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही दंडाची रक्कम खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देण्याचा निर्णय दिंडोशी न्यायालयाने दिला. दिंडोशी न्यायालयाने दिलेला निकाल आतापर्यतच्या न्यायालयांपेक्षा वेगळा आहे. कांदिवली येथी रहिवाशी स्व.कपूरचंद गुप्ता आणि खून प्रकरणातील आरोपी शिवप्रसाद …

Read More »