मुंबई

विजेत्यांचे हाल तर लोढाच्या प्रकल्पाकडे म्हाडाची डोळेझाक म्हाडा विरोधात विजेत्यांकडून पोलीसात तक्रार

मुंबई : विशेष प्रतिनिधी इंटीग्रेटेट टाऊनशिप योजनेतंर्गत म्हाडाला दिलेली घरे केवळ स्वस्त दरात नागरीकांना उपलब्ध होवू नयेत यासाठी भाजपाच्या मंगलप्रभात लोढांच्या पलावा सिटीने त्या घरांचा ताबाच अद्याप रहिवाशांना दिले नाही. तसेच लोढा डेव्हल्पर्सच्या या कृत्यावर म्हाडाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याने अखेर या रहिवाशांनी पोलिसांत धाव घेतली आहे. राज्य सरकारच्या …

Read More »

बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर पोलिस मुख्यालयात अनुभवायला मिळणार ‘चेंज ऑफ गार्ड’ गृहमंत्री देशमुख, पर्यावरण मंत्री ठाकरेंची संकल्पना

मुंबई: प्रतिनिधी लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात ‘चेंज ऑफ गार्ड’ ही अभिनव संकल्पना येत्या महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘युनायटेड किंगडम’च्या राजघराण्याचा राजप्रासाद ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे सुरक्षारक्षकांचे अत्यंत प्रेक्षणीय असे ‘चेंज ऑफ गार्ड’ हे प्रात्यक्षिक होत असते. आठवड्यातील ठराविक …

Read More »

अवैध मासेमारांवर कारवाईचे अधिकार मत्स्य विभागाकडे घेणार अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छिमार बंदरांवर सीसीटीव्ही बसविण्याची मंत्री शेख यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी अवैध मासेमारीला रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करा अवैध मासेमारीविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पोलीस व महसूल प्रशासनास असून हे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे घेण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवस्या मंत्री अस्लम शेख यांनी दिली. १२ सागरी मैल ते २०० सागरी मैल यामध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी केंद्र शासन कायदा करणार …

Read More »

फडणवीसांकडून घरांचा साठा बंद, तर ठाकरे सरकारने केला निम्म्याहून निम्मा प्रिमियम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पानांही मिळणार प्रिमियममध्ये सूट

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यासाठी विकासकांकडून घरांचा साठा घेण्याच्या निर्णयाला फडणवीस सरकारने फिरविला. त्याऐवजी प्रिमियममध्ये निम्याने कपात करत तोच भरण्यास विकासकांना सांगितले. तर विद्यमान ठाकरे सरकारने या प्रिमियममध्ये निम्म्यापेक्षा निम्म्याने कपात करण्याचा निर्णय घेत हा निर्णय ऑगस्ट २०१९ पूर्वीच्या रखडलेल्या प्रकल्पांनाही लागू करण्याचा निर्णय घेतल्याने …

Read More »

नगरविकासच्या मनिषा म्हैसकर यांच्याकडे आता राजशिष्टाचार विभाग ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या महत्वाच्या विभागाचे प्रधान सचिव असलेल्या मनीषा म्हैसकर-पाटणकर यांची आज बदली करण्यात आली असून त्यांची रवानगी आयएएस अधिकाऱ्यांसाठी शिक्षेचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज शिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव पदी करण्यात आली. त्यांच्यासह आठ आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या. जयश्री भोज व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक …

Read More »

केंद्र आणि राज्य सरकारच्या पहिल्याच कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री आदीत्य ठाकरेंच्या हस्ते मुंबईत ७-८ फेब्रुवारीला २३ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद

मुंबई: प्रतिनिधी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि डिजिटल अर्थव्यवस्था, शासनाच्या परिणामकारक शासन आणि सेवा वितरणासाठी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर, सेवा वितरणाचा स्तर उंचावणे, डिजिटल व्यवहाराबाबत विश्वासार्हता वाढविण्यासाठी पारदर्शिता याची सविस्तर माहिती करून देण्यासाठी आणि त्याचे महत्व समजून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने ७-८ फेब्रुवारीला २३ व्या राष्ट्रीय …

Read More »

घरांच्या किंमतींसाठी रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली …

Read More »

CAA विरोधी आंदोलकांच्या रेट्यापुढे पोलिसांची माघार राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनास दिली २० मिनिटांची परवानगी

कल्याणः प्रतिनिधी संपुर्ण देशभरात CAA अर्थात केंद्राच्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही भारताचे लोक समितीतर्फे येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार होती. सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली. मात्र आंदोलनकर्त्ये नियोजित जमा होवू लागल्याने अखेर पोलिसांनीच माघार घेत आंदोलनकर्त्यांना अवघ्या २० मिनिटांची …

Read More »

पत्रकार संजय घावरे यांचा कलाश्रम पुरस्काराने सन्मान डॉ.संध्या पुरेच्या यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मुंबईः प्रतिनिधी दिवंगत स्वातंत्र्यसैनिक डॅा. परशुराम पाटील कलाकेंद्र कलाश्रमच्या वतीनं प्रत्येक महिन्यात निधन पावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. मनोरंजन क्षेत्रातील पत्रकारीतेत लक्षवेधी कामगिरी करणारे वरिष्ठ वार्ताहर संजय घावरे आता या दिग्गजांच्या पंक्तीत विराजमान झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार पाटील आणि कलाश्रमच्या संचालिका …

Read More »

बार आणि पब सोडून रात्रीची मुंबई जागी राहणार नाईट लाईफचा पहिला टप्पा २७ जाने.पासून सुरू होणार असल्याची पर्यटन मंत्री ठाकरे, गृह मंत्री देशमुख यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रात्री झोपणाऱ्या मुंबईला जागे राहणास अर्थात नाईट लाईफ सुरू ठेवण्यासंदर्भात कायदेशीर परवानगी देण्याचा विचार अखेर सत्यात उतरणार आहे. मुंबई नाईट लाईफच्या पहिल्या टप्प्यात परमिट रूम, बिअर बार, पब वगळता चित्रपट थिएटर, खाऊ गल्ली, मिल कंपाऊंडमधील मॉल्स, दुकाने सुरु ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून …

Read More »