मुंबई

रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २९ आणि ३० एप्रिल या दोन …

Read More »

१ कोटी ७७ लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या टिकटॉक कडून ५ कोटी कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊन काळात समाजमाध्यमातून लोकांशी संवाद साधल्यानंतर पुन्हा विविध माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी टिकटॉक अॅपचा फायदा झाला असून अल्पावधीतच १ कोटी ७७ लाख नागरिकांपर्यत सहजरित्या पोहोचता आले. त्याच टिकटॉक कंपनीने राज्याच्या कोविड विरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रूपयांची मदत दिली. …

Read More »

परप्रांतीय मजूरांसाठी ३मे नंतर मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज पुन्हा ५ टक्के कर्मचाऱ्यांवर चालणार राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. त्यामुळे अखेर मंत्रालयाचे कामकाज चालविण्यासाठी १० टक्क्यापर्यंत वाढविण्यात आलेली कर्मचाऱी-अधिकाऱ्यांची संख्या पुन्हा ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले. मुंबई महानगरात, …

Read More »

मुंबई- पुणेकरांनो ऐकत नाही ना काढून घेतल्या तुमच्या सवलती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे …

Read More »

मंत्री गुलाबराव पाटीलांच्या खाजगी सचिवाचा असाही पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, …

Read More »

मंत्रालयातील सर्व सहसचिव, उपसचिवांनी हजर राहीलेच पाहिजे महिला अधिकाऱ्यांच्या बाबत सचिवांनी निर्णय घेण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधील काही गोष्टी शिथिल करत राज्याच्या अर्थचक्राला चालना देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरुवातीला फक्त उपसचिवांसह इतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश काढण्यात आले. मात्र प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहसचिवांचा सहभागही महत्वाचा असतो. त्यामुळे मंगळवार २१ एप्रिलपासून सहसचिव, उपसचिवांची उपस्थिती आवश्यक अर्थात १०० टक्के करण्याचा …

Read More »

मुख्यमंत्री साहेब, मंत्रालयाच्या गेटवर सँनिटायझर टनेल बसवाल का ? मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन असतानाही राज्याच्या प्रशासनाचे कामकाज आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्यापासून मंत्रालयातील कामकाजात अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर सँनिटायझरच्या टनेलची व्यवस्था करावी अशी मागणी शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वाढत्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान …

Read More »

मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनो गावी आहात तर जिल्हाधिकारी-पोलिसांशी संपर्क साधा कार्यालयीन मुख्यालयात हजर होण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील लॉकडाऊनची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्याआधीच मंत्रालयातील अनेक अधिकारी आपल्या मूळ गावी किंवा नातेवाईकांच्या गावी गेलेले आहेत. अशा गावी गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्रालयात हजर होण्यासाठी संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून मंत्रालयातील आपल्या जागेवर रूजू व्हावे असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले आहेत. कोरोना …

Read More »

मालकानों, भाडेकरूंना घरभाड्याचा तगादा लावू नका राज्य सरकारची सर्व घरमालकांना सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद स्वरूपात आहेत. त्यामुळे भाड्याने रहात असलेल्या अनेकांना घरभाडे देणे अशक्य होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही भाडेकरूच्या पाठी घरभाड्यासाठी घरमालकांनी तगादा लावू नये असे आवाहन राज्य सरकारने केले असून घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी अशी सूचनाही केली. लॉक़डाऊनमुळे सर्वच संस्था, बाजारपेठा, व्यावसायिक …

Read More »