२८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध: ९ कोटी मतदार मतदान करणार उमेदवारी अर्ज छाननीत ७ हजार उमेदवारांचे अर्ज वैध

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

या ७ हजार ७३ वैध उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील ९ कोटी ७० लाख मतदार मतदान करणार आहेत. यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला उमेदवार आहेत. तर तृतीयपंथीय उणेदवार ६ हजार आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ तर तृतीयपंथी मतदार ६ हजार १०१ इतक्या मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

राज्यात सर्वात जास्त मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ४५ लाख ७९ हजार २१६ पुरूष मतदार, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ८०५ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्यात सर्वात कमी मतदारांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ९९१ पुरूष मतदार, ३ लाख ४१ हजार ९३४ महिला मतदार तर तृतीयपंथी मतदार ३ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे.

या व्यतिरिक्त राज्यात सेवादलातील (सर्व्हिस व्होटर) १ लाख १६ हजार १७० मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये १ लाख १२ हजार ३१८ पुरूष मतदार तर ३ हजार ८५२ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे.

राज्यात वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३८९ इतक्या मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार २१ हजार ८९, महिला मतदार २६ हजार २९८ तर तृतीयपंथी मतदार २ इतक्या मतदारांनी नोंदणी केली आहे.

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस; चार आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रकरण लवकरच उघड भाजपाचा महिलांबद्दलचा कळवळा बेगडी; महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच मंजूर

भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *