मुंबई महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने दिली वाय दर्जाची सुरक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली असून ही बाब धक्कादायक असल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचीच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा असेही ते म्हणाले.

विधानभवनात बोलताना प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनीम वरील माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना यांच्यात ट्विटरवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. दरम्यान मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ही सुरक्षा पुरविल्याबद्दल कंगनाने  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

About Editor

Check Also

अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर

भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *