ठाकरे सरकारने वैयक्तिक सुडाने पेटून महापालिकेला तोंडघशी पाडले भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
कु-हेतू, वैयक्तिक सुडबुध्दीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्यावर्षभर सुरु आहे. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्का मोर्तबच केले. ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडल्याचा आरोप भाजपाचे माजी मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला.
आता कंगणा रनौत यांना नुकसान भरपाई द्यावी लागली तर…? कंगणा यांच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे सुमारे १ कोटी आणि कंगणा यांनी दावा केलेले २ कोटी अशी जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी अशी मागणी केली.
सुडबुध्दीने कुणालाही अटक करायची, मारहाण करायची, घरावर बुलडोझर चालवायचे.. आणि बोट मात्र दुसऱ्याकडे दाखवायचे अशी खोचक टीका त्यांनी केली.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *