भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय संध्याकाळी ७.३० नंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १७ दिवस झाले. तसेच राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला कौल दिलेला असतानाही शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु ठेवल्याने याबाबतचा निर्णय राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीनंतर अर्थात संध्याकाळी ७.३० वाजल्यानंतर युतीबाबतचा निर्णय भाजपा घेणार असल्याची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचा दावा करण्याबाबत विचारणा केली. परंतु भाजपाने काल राज्यपालांची भेट घेत महायुती म्हणून शिवसेना सोबत येत नसल्याने आणि सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ जमत नसल्याने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दाखविली. त्यानंतर भाजपाने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर शिवसेनेने सोमवारी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांना मागितली. आज सकाळपासूनच राज्यातील सत्ता स्थापनेच्यादृष्टीने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असून सत्ता वाटपाच्यादृष्टीने बोलणी सुरु केली आहे.
त्यामुळे शिवसेनेला दिलेली मुदत संध्याकाळी ७.३० वाजता संपणार असल्याने तत्पूर्वी शिवसेनेने जर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दावा केल्यास भाजपाकडून युती तोडण्याबाबतची अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाईच्या धोरणास मान्यता जवळच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पोलीस कोठडीतील व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या जवळच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *