महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी मुख्यमंत्री फ़डणवीस यांची माजी खा निंबाळकरांना क्लिन चिट विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजित निंबाळकर यांचा नामोल्लेख करत आरोप केले होते. मृत तरूणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात साताऱ्यातील खासदार असा उल्लेख असल्याचे दानवे आणि इतर विरोधकांनी म्हटले होते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यादा भाष्य करत म्हणाले की, महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांचे नाव आले त्यांच्यासोबत मी व्यासपीठावर बसणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या दौऱ्यावर असून येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, हा दौरा रद्द करावा असा काही जणांनी प्रयत्न केल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनीच यावेळी केला. तसेच अंबादास दानवे यांनीही आज सकाळी एक्सवर पोस्ट टाकून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांचे नाव आले, त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमच्या एका लहान बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्याचे कारणही तिने हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटकही केली. त्यातील जवळपास सत्य बाहेर येत आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमच्या लहान बहिणींना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही स्वस्थ राहणार नाही. हा निर्णय आम्ही घेतला आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे, अशा प्रकरणाचा निंदनीय प्रयत्न होताना दिसला नाही. काहीही कारण नसताना रणजीत नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांचे नाव घुसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहित आहे. मला थोडीजरी शंका असती तर मी हा कार्यक्रम रद्द या ठिकाणी आलो नसतो असेही यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, अशा प्रकरणात मी पक्ष, व्यक्ती पहात नाही. राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहे. तिथे तडजोड करत नाही. पण प्रेताच्या टाळूवरचे लोणी खायचा प्रयत्न असेल कुणी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही मी सहन करणार नाही.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा प्रशासकीय सुधारणांचा ‘जीपीआर 2.0’ उपक्रम

राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *