मुख्यमंत्री तुम्हाला गृह खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा औरंगाबादच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेचाही प्रश्न ऐरणीवर नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस दलातील महिला कर्मचारी सुरक्षित नाहीत. त्यांच्या कुटुंबातील मुली, लोकं सुरक्षित नाहीत. मग राज्यातील महिलांच काय होणार असा सवाल करत मुख्यमंत्री तुम्ही करताय काय ? तुम्हाला खातं सांभाळता येत नसेल तर चालते व्हा असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला.

औरंगाबादमधील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीवर एका आयपीएस पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नवाब मलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

आज औरंगाबादची घटना समोर आलीय.आयपीएस अधिकारी महिला पोलिसांच्या मुलीवर बलात्कार करत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी महिलांचा छळ करत आहेत. त्यांच्या हत्या करुन त्यांचे मृतदेह फेकून देत आहेत. या महाराष्ट्र पोलिस दलात चाललंय काय असा संतप्त सवालही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना केला.

या राज्यातील पोलिस महिला कर्मचारी, अधिकारी, त्यांचं कुटुंब सुरक्षित नाहीत तिथे राज्यातील महिला कशा सुरक्षित राहतील याबाबत राज्यातील जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून त्यातून राज्याचे मुख्यमंत्री अकार्यक्षम झालेले आहेत हे सिध्द झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यावर केला.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *