मेडिकलच्या परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगस्ट किंवा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर मध्ये होणार वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या आराखड्याला राज्यपालांची मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १५ जुलै पासून किंवा १६ ऑगस्टपासून परिक्षा घेण्याचा आराखडा तयार केला. या आराखड्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखडयाला मंजूरी दिली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज (४ जून) राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परिक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परिक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतुक केले.
राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगितले. पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परिक्षा १५ जूलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येतील. करोना परिस्थितीमुळे या कालावधीत परिक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परिक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येईल.
उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परिक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने परिक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परिक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबधित घटकांशी, माजी कुलगुरु, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले.
या संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिचर्या परिषद, वैद्यकीय परिषद तसेच इतर केंद्रीय संस्थाशी देखील सल्लामसलत केल्याचे त्‍यांनी सांगितले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी दिलेल्या मंजूरीबाबत विद्यापीठाच्या कुलगुरुंना देखिल स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही

राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *