आर्थिक मंदी नाही तर भाजप नेत्याने स्वतः च्या कंपनीतील ४०० जणांना का काढले? राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या भोवऱ्यात सापडली आहे. तरीही केंद्र सरकार आणि भाजपाकडून देशात मंदी नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग देशात मंदी नाही तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना का काढले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला.
देशातील आर्थिक मंदी आहे. पण भाजपचे नेते ती मान्य करायला तयार नाहीत. अनेक उद्योग बंद पडत असून हजारो-लाखो बेरोजगार होत आहेत. त्यामुळे अनेक उद्योजकांकडून कंपन्यातील कामगार कपातीचा निर्णय घेत आहेत. आता भाजपच्या मुंबई अध्यक्षांनीच त्यांच्या कंपनीतील ४०० जणांना कामावर कमी करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे किमान भाजपाच्या मुंबई अध्यक्ष लोढा यांनी ४०० जणांना कामावरून काढल्याने भाजपा नेते आता देशात आर्थिक मंदी असल्याचे मान्य करतील अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *