पंतप्रधानांनी सांगावे, बांग्लादेश मुक्तीच्यावेळी कधी आणि कोणत्या जेलमध्ये ठेवले? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे लगावला.

बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार खिल्ली समाजमाध्यमातून उडवली जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *