परमबीरसिंग हे दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे योग्यवेळी सत्य बाहेर येईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर आणि गृहमंत्र्यांवर अधिकार्‍यांनी सवाल उपस्थित केले होते त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल करत परमबीर सिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे असून ती योग्य वेळी देण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.
भाजपचे मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली असून या टिकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले.
रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भाजप हायमोऱ्यालिटीची वार्ता करते मात्र त्यांचे कोणी संघटनात्मक पदावर नाहीत. मात्र संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारची रिपोर्टींग करतात ही कोणती मोऱ्यालिटी… ही कोणती संघटनात्मक प्रोसेस आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान परमवीरसिंग यांचे पत्र ही ठरवून केलेल्या एका कटाचा हिस्सा आहे. परमवीरसिंग दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे चौकशीतून याची सत्यता समोर येईल असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत महामंडळाचा सामंजस्य करार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *