राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी,….पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा पुलवामा आणि जम्मू काश्मिरप्रकरणी करण्यात आलेले गंभीर

पुलवामात ४० जवान शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असा दावा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला असेल तर यावर तात्काळ पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला हा बेपर्वाईमुळे झाला आहे असा खळबळजनक दावा केला आहे. यावर बोलण्यास पंतप्रधानांनी मज्जाव केला असाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा माहिती देऊनही कारवाई केली नाही असाही दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. माजी राज्यपालांनी केलेल्या खळबळजनक विधानावर सत्य जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० प्रभावशाली नेत्यांच्या यादीत स्थान मिळाले नाही याचे आश्चर्य वाटले नाही. परंतु गेल्या नऊ वर्षांत हे सरकार जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. शिवाय महागाई, बेरोजगारी आणि जातीयवाद वाढत असल्याने भारताची सामाजिक जडणघडण विस्कळीत झाली आहे, त्यामुळे मोदींची जादू ओसरली आहे असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *