मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये …
Read More »सर्व खाजगी, सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील खाजगी आणि सरकारी रूग्णालयांमध्ये आगीच्या घटना वारांवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेशही …
Read More »आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण वाढवा-देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर: प्रतिनिधी कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असा सल्ला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिला. गेल्यावर्षी …
Read More »“मोफत लस” सरसकट कि फक्त आर्थिक दुर्बल घटकासाठी? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत
मुंबई: प्रतिनिधी १८ वर्षावरील राज्यातील ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्याची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनापासून सुरुवात होणार आहे. मात्र या वयोगटातील नागरीकांसाठी देण्यात येणारी लस ही केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येणार की राज्य सरकारने त्यांच्या पैशातून द्यावे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील जनतेला मोफत लस सरसकट किंवा फक्त …
Read More »काँग्रेस म्हणते, आता मुख्यमंत्र्यांनीच अधिकृत घोषणा करावी मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य: बाळासाहेब थोरात
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेचे कोरोनापासून संरक्षण करण्याच्यादृष्टीकोनातून मोफत लस देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी जाहिर यांनी करताच शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय जाहिर करणार असल्याचे ट्विट करत अंतिम निर्णय झाले नसल्याचे स्पष्ट केले. तर मोफत लस …
Read More »“त्या” आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सीबीआयप्रकरणी इशारा
पुणे : प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पिंपरी …
Read More »महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार-नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. केंद्र सरकारने १ …
Read More »अनिल परब, संजय राऊत यांचीही चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे : प्रतिनिधी परमबीरसिंग यांच्या पत्रावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशी केली व त्यानुसार एफआयआर दाखल करून छापे मारले. त्याचप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांच्या संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात केली. …
Read More »केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयात बेड्सही मिळत नाहीत. हे केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे परिणाम आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लसीकरणासंदर्भात तरी योग्य ते नियोजन करणे अपेक्षित असताना त्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी …
Read More »सीबीआयच्या धाडीवर संजय राऊत म्हणाले दया, कुछ तो गडबड है ! अनिल देशमुखांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांच्या निवासस्थानासह इतरांच्याही निवासस्थानी सीबीआयने छापेमारी सुरु केली. त्यामुळे सीबीआयच्या धाडी एफआयआर वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार तर्कसंगत दिसत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी व्यक्त करत दया, कुछ तो गडबड है अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya