राजकारण

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत २० हजार जणांना प्रशिक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्व …

Read More »

केंद्रात फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची …

Read More »

प्रकाश आंबेडकर वंचितपासून तीन महिने राहणार दूर आघाडीची सारी सुत्रे आता रेखा ठाकूर यांच्याकडे

मुंबई: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर हे पक्षापासून तीन महिने लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील तीन महिने ते वंचितच्या कोणत्याही दैंनदिन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत पुढील कालावधींकरीता रेखा ठाकूर यांच्या हाती सारी सुत्रे हस्तांतरीत केले. तसेच आगामी ५ जिल्ह्यातील पोट निवडणूका पूर्ण ताकदीनीशी लढण्यासाठी …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, हे तर एकनाथ खडसेंच्या विरोधात भाजपाचे कुंभाड राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याने भाजपा केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय-जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भोसरी येथील जमिन खरेदीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला काल ईडीने अटक केल्यानंतर आज खडसे यांनाच ईडीने चौकशीला पाचारण करण्यात आले. तसेच सकाळपासून त्यांची ईडी कार्यालयात अद्यापही चौकशी सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, केवळ राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना सन्मानाने …

Read More »

राणेंकडे एमएसएमई तर गडकरीकडील एक खाते काढले डॉ.कराड नवे अर्थ राज्यमंत्री, पाटील पंचायत राज्यमंत्री, तर पवार आरोग्य राज्यमंत्री

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांच्याकडे मायक्रो-स्मॉल अॅण्ड मिडियम एंटरप्रायझेस अर्थात एमएसएमई या खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गडकरी यांच्याकडील रस्ते महामार्ग वगळता शिपींग कार्पोरेशन, पोर्ट आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी सरबानंद सोनोवाल यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय डॉ.भागवत कराड यांच्याकडे …

Read More »

१२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्नी न्यायालयात जाणार महाविकास आघाडीच्या विरोधात मागणार दाद अॅड आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने, षडयंत्र रचून भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले असून त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, मुंबईचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर, आमदार योगश …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसह या १२ जणांचे राजीनामे घेतले प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, संतोष गंगवार, डॉ.हर्षवर्धन, निशांख, गहेलोत यांचा समावेश

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत असलेल्या चर्चेला अखेर आज मुर्त स्वरूप आले आहे. नव्या मंत्रिमंडळात एकूण ४३ जणांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकाश जावडेंकर यांच्यासह १२ जणांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी घेतले. दिड वर्षापासून कोरोना काळात आपल्या मंत्री पदानुसार योग्य …

Read More »

जगणे महाग करणाऱ्या जुलमी मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून गुरुवार ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या …

Read More »

कृषी सुधारणा विधेयके विधानसभेत सादर विधेयकावर जनता, शेतकरी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सूचना मागवल्या

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतक-यांच्या नाही तर फक्त मुठभर मोठ्या उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकरी उद्धवस्त होणार आहे. वास्तविक पाहता कृषी संबंधी कायदे हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकारने त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना वाचवण्यासाठी व शेतक-यांच्या हितासाठी महाराष्ट्र विकास आघाडी …

Read More »

बेरोजगारांसाठी खुषखबर! १५ हजार ५११ रिक्त पदे एमपीएससी मार्फत भरणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात विविध विभागांमध्ये १५ हजार ५११ अ, ब, क वर्गातील जागा रिक्त असून या सर्व जागा एमपीएससी आयोगाच्या मार्फत लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत करत एसईबीसी उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यात आल्यामुळे उमेदवारांच्या जास्तीची नोकरी सेवा करता …

Read More »