मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. २२ मार्च २०१२ …
Read More »हॉटेल्स, रेस्टॉरंट, फूड कोर्टला ५ ऑक्टोंबरपासून परवानगी पुणे-मुंबई रेल्वे सेवा पूर्ववत डब्बेवाले, सर्व उद्योगांना परवानगी राज्य सरकारकडून मिशन बिगेन अंतर्गत आणखी नव्या सवलती
मुंबई: प्रतिनिधी मिशन बिगेन अगेन-६ अंतर्गत राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड कोर्ट सुरु करण्यास राज्य सरकारने ५ ऑक्टोंबरपासून परवानगी देत डब्बेवाल्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासही मान्यता दिली. याशिवाय मुंबई महानगर प्रदेशातील सर्व लहान-मोठ्या उद्योग (मॅन्युफॅक्चरिंग युनिट) आणि अत्यावश्यक सेवेत न येणाऱ् सर्व गोष्टी सुरु करण्यास परावनगी दिली. त्याचबरोबर मुंबई-पुणे दरम्यान …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा मंत्रिमंडळाने फेटाळत केली उपसमितीची स्थापना केंद्राच्या कृषिविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती
मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने संसदेत कृषी विषयक तीन विधेयके मंजूर केली. मात्र ही विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केली होती. तसेच याविषयीचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले. परंतु आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखआली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित …
Read More »बाबरी मशीद खटल्याचा निकाल धक्कादायक असून वस्तुस्थितीला धरून नाही काँग्रेसचे माजी खा. हुसेन दलवाई यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी बाबरी मशीद खटल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने आज दिलेला निकाल धक्कादयक असून वस्तुस्थितीला धरून नाही. यामुळे देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल अशी भीती माजी खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. बाबरी मशीद पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराकडून राष्ट्रव्यापी मोहीम राबविण्यात आली. रथयात्रा काढण्यात आल्या, दंगली घडविल्या यात …
Read More »बाबरी विध्वंस प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला तो अपेक्षितच आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही- नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी बाबरी विध्वंस प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे तो अपेक्षितच होता. त्यामुळे आम्हाला निकालानंतर आश्चर्य वाटत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत मांडले. पुराव्याअभावी आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे. परंतु युट्यूबवर गेलात तर जगामध्ये व्हिडीओ उपलब्ध आहेत. ६ डिसेंबर …
Read More »Babri Masjid Demolition: ठोस पुरावे नसल्याने सर्व आरोपी निर्दोष वृत्तपत्रातील बातम्या, व्हिडिओ फुटेज पुरावे होवू शकत नसल्याचे सीबीआय न्यायालयाकडून जाहीर
अयोध्या: मराठी ई बातम्या.कॉम टीम साधारणत: २८ वर्षापूर्वी अर्थात १९९२ साली अयोध्येतील सुप्रसिध्द बाबरी मस्जिद भाजपा-शिवसेनेच्या नेतृत्वाखालील कारसेवकांनी पाडल्याचे दृश्य त्यावेळच्या देशातील सर्व जनतेने पाहिले. तसेच मस्जिदीच्या परिससरापासून काही अंतरावर भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, स्व.प्रमोद महाजन यांच्यासह विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली …
Read More »आगामी नवरात्रोत्सव साजरा करताना या नियमांचे पालन करा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता१७ ऑक्टोबरपासून सुरु होणारा या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. तसेच हा उत्सव साजरा करताना गृह विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. मार्गदर्शक सूचना : १. …
Read More »केंद्रात शेतकऱ्यांचे नाही तर सुटबुटवाल्यांचे सरकार शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, काँग्रेसचे राज्यपालांना निवेदन
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. ही विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजेत अशी भूमिका असून या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे. कोणाशीही चर्चा न करता शेतकरी विरोधी कायदे लादणारे केंद्रातील भाजप सरकार हे जनसामान्यांचे, शेतक-यांचे नसून फक्त …
Read More »लता दिदींच्या वाढदिवसानिमित्त सरकारकडून जागतिक दर्जाच्या संगीत महाविद्यालयाची भेट उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईत ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर शासकीय संगीत महाविद्यालय’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगीतकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय …
Read More »रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे लवकरच अंतिम होणार रेस्टॉरंट व्यवसायिकांच्या संघटना प्रतिनिधीशी मुख्यमंत्र्यांचा संवाद
मुंबई : प्रतिनिधी राज्यशासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. कोरोनाचे संकट मोठे असून …
Read More »
Marathi e-Batmya