राजकारण

मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात …

Read More »

कोणत्याही विभागातला कर्मचारी मृत पावल्यास ५० लाख लवकरच योग्य तो निर्णय होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असून याकामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादूर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत याबाबत योग्य तो निर्णय होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. कोरोना लॉकडाऊनकाळात रोगजाराच्या …

Read More »

राजस्थानातील ते १८०० विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई-चंद्रपूर : प्रतिनिधी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राजस्थानमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने बोलणी सुरु केली असून हे विद्यार्थी लवकरच राज्यात परतणार असल्याची माहिती दिली. राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले १८०० विद्यार्थ्यांना राज्यात परत आणण्यासाठी मदत व पुनर्वसन विभाग पूर्ण प्रयत्न …

Read More »

माजी म्हणाले विद्यमान मुख्यमंत्र्यांना, कर्ज वसूली ६ महिने थांबवा मुख्यमंत्री ठाकरेंकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली पत्राद्वारे मागण्यांची यादी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत यापार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशानुसार नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूलीवर तीन महिन्यासाठी कोणताही हप्ता भरू नये यासाठी सुट देण्यात आली. मात्र ही तीन महिन्याची सूट पुरेशी नसून ही मुदत सहा महिन्यापर्यत वाढविण्यात यावी आणि …

Read More »

बांधकाम कामगारांनो २००० रू. मदतीसाठी अर्ज व दस्तावेज नको कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पध्दतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर …

Read More »

काँग्रेसकडून पालघरप्रकरणातील भाजपा कार्यकर्त्यांचे कनेक्शन उघड प्रवक्ते सचिन सावंत यांनी फोडले बिंग

मुंबई: प्रतिनिधी पालघरमधील ज्या गडचिंचले गावात तिघांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली. त्या ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून भाजपाची सत्ता असून चित्रा चौधरी ह्या सध्या तिथल्या सरपंच आहेत. या घटनेत भाजपाचे स्थानिक बुथ कार्यकर्त्ये असून त्यांच्या नावाची अधिकृत यादी भाजपाने त्यांच्या पक्षाच्या डहाणू फेसबुकवर घोषित केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …

Read More »

एप्रिलचा पूर्ण पगार मिळणार, मार्चचा अर्धा पगार गणपतीत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी कोव्हीड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे …

Read More »

मुख्यमंत्र्याच्या फोनचा ४० हजार जणांना फायदा अखेर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा …

Read More »

महिलाही कोरोना विरोधी लढ्यात पुढे माविमची ११ लाख रूपयांची मदत तर बचतगटांकडून लाखावर मास्क

मुंबई-यवतमाळ : प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी १ रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास …

Read More »