राजकारण

‘डिजीटल स्त्री शक्ती’ : ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’ राज्य महिला आयोगाचा उपक्रम- ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या २१ जुलै रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील १० शहरातील ५०००महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. …

Read More »

नव्या १२ हजार ५३८ पोलिस भरतीसह २०१९ च्या अर्जदारांचीही भरती होणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरती साठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या असून डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव …

Read More »

सोलापूर जिल्ह्यातील या ३१ गावात संचारबंदी लागू जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

सोलापूर : प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ३१ गावात गुरूवार, १६ जुलैच्या रात्री २३.५९ वाजलेपासून २६ जुलैच्या रात्री २४.०० पर्यंत दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, …

Read More »

हवं तर रस्त्याचा मार्ग बदला, पण वटवृक्ष वाचवा आदित्य ठाकरेची नितीन गडकरींना विनंती

मुंबई: प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन असलेला वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. त्याचबरोबर मंत्री ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन हा वटवृक्ष वाचविण्याबाबत कार्यवाही …

Read More »

राऊत हे सेनेचे खासदार मात्र दिल्लीत पवारांचा माणूस म्हणून ओळख भाजपा खासदार नारायण राणे यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करण्यात आली. मात्र आता त्याच सामनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या शरद पवारांचा उदोउदो करण्यात येत असून संजय राऊत हे जरी शिवसेनेचे खासदार असले तरी दिल्लीत मात्र ते पवारांचा माणूस म्हणून ओळख असल्याची टीका भाजपा खासदार …

Read More »

बदनामी केलात, चंद्रकांतदादा पाटील माफी मागा नाही तर दिलगीरी व्यक्त करा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सेनिक अल्बम ३० हे होमोओपॅथीक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदीक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर चुकीची माहिती सांगून लोकांची दिशाभूल केली. माझी तसेच शासनाची बदनामी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माफी …

Read More »

SC-ST विद्यार्थ्यांकडून वाढीव फि घेणाऱ्या संस्थावर कारवाई करा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनची मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद असताना अनेक महाविद्यायांच्या इमारती, तेथील वसतिगृहे रूग्णांवरील उपचारांसाठी सरकारनेच ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे महाविद्यालये पुन्हा कधी सुरू होतील याची कोणतीही शाश्वती नसताना अनेक महाविद्यालयांनी मात्र फि वसूली करण्यास सुरुवात केली असून राज्यातील SC-ST च्या विद्यार्थ्यांकडून निर्धारीत केलेल्या फि पेक्षा वाढीव फि महाविद्यालयांनी …

Read More »

गृह मंत्री देशमुख म्हणाले, या ऑनलाईन चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घाला रझा अकादमीच्या तक्रारीवरून केंद्राला लिहिले पत्र

मुंबई : प्रतिनिधी सध्या काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मुहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मात्र या चित्रपटामुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपट ऑनलाईन दाखविण्यावर बंदी घालावी अशी विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्र लिहित केंद्रीय आयटी मंत्र्यांकडे केली. मुहम्मद द मेसेंजर ऑफ …

Read More »

Z.P च्या प्राथमिक शिक्षक आणि ३, ४ श्रेणीतील बदल्या १५ टक्क्यांच्या मर्यादेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ह्या राज्य शासनाच्या धोरणानुसार १५ टक्के मर्यादेपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पद्धतीने तर जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे या वर्षाच्या …

Read More »

सर्व जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा : जात पडताळणीसाठी ६ महिन्याची मुदतवाढ मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यानाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही …

Read More »