राजकारण

पवारांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री करतायत आंबेडकरी जनतेशी जवळीक अजित पवारांकडून भीमा कोरेगांव, चैत्यभूमी, इंदू मिल स्मारकाला भेटी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेताच आपल्या पदाचा भार स्विकारताच आंबेडकरी जनतेची अस्मितेच्या ठिकाणांना भेटी देत तेथील विकास कामांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले. त्यामुळे याबाबत दस्तुरखुद्द शरद पवारांनीच याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आंबेडकरी …

Read More »

खडसेंच्या नाराजीनाट्यात मुनगंटीवार करणार मध्यस्थी विधीमंडळ किंवा संसदेवर पाठविण्याची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहिम काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नाराजी सातत्याने जाहीर करणे सुरुच ठेवल्याने माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अयशस्वी प्रयत्न नंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खडसेंची नाराजी दूर कऱण्यासाठी …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांना केला “मानाचा मुजरा” सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीद वाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. …

Read More »

मंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी सरकारी बाबूंची धावपळ शिफारसीसाठी राजकिय कार्यकर्ते, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे धावाधाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्री, राज्यमंत्र्यांना खातेवाटप अद्याप झालेला नाही. तरी प्रशासकिय सेवेतील अनेक अधिकारी मंत्र्यांकडील विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव पदावर नियुक्ती मिळावीसाठी राजकिय कार्यकर्ते आणि मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे शिफारसीसाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडे काँग्रेस …

Read More »

अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यासाठी ८ जानेवारीला विशेष अधिवेशन राखीव जागांच्या कायद्याच्या समर्थनासाठी

मुंबईः प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक …

Read More »

मराठी ई-बातम्याने भाकित केलेल्या मंत्र्यांसह ३६ जणांचा शपथविधी उपमुख्य़मंत्री पदी अजित पवार, शिवसेनेचे आदीत्य ठाकरे झाले मंत्री

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने शिवसेनेच्या ६, काँग्रेसच्या ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ मंत्र्यांची नावे भाकित केली होती. यापैकी बहुतांष आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतल्याने मराठी ई-बातम्या.कॉमचे वृत्त खरे ठरले. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ अजित पवार यांनी घेतली. तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडूण आलेले आदीत्य ठाकरे यांचाही …

Read More »

विखे- शिंदेंमधील धुसफुस भाजपाच्या कोअर कमिटीत लवकरच अधिकृत कारवाई करणार

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत कर्जत-जामखेडसह अहमदनगरमधील अनेक मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या विरोधात विखे-पाटील पितापुत्रांनी काम केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला होता. तसेच या पिता-पुत्र आणि शिंदे यांच्यातील धुसफुस वाढल्याने अखेर या धुसफुसीवर तोडगा काढण्यासाठी भाजपाचे संघटनमंत्री विजय पुराणीक, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेत यावर तोडगा …

Read More »

३० डिसेंबरला विधानभवनात होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधिमंडळाकडून परिपत्रक जारी

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या मोकळ्या प्रांगणात होणार आहे. या शपथविधीच्या अनुषंगाने विधिमंडळाकडून अधिकृत परिपत्रक काढण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० डिसेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ३० मंत्र्यांना शपथ देणार आहेत. यामध्ये …

Read More »

शिवसेनेकडून रावते,कदम, वायकर यांना नारळ तर भुसे, केसरकर, प्रभु यांना बढती यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी इच्छुकांकडून मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश व्हावा यासाठी अनेक आमदार प्रयत्नशील आहेत. मागील सरकारमधील राज्यमंत्री दिपक केसरकर, दादाजी भुसे या राज्यमंत्र्यांना थेट कॅबिनेट पदी बढती देण्यात येणार आहे. तर सुनिल प्रभु यांना पक्षप्रतोद पदावरून कॅबिनेट मंत्री पदी बढती देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची …

Read More »

पंतप्रधान मोदींनाच आम्ही भीती दाखविणार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी देशात सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ लाख रूपये देण्यावरून जसे खोटे बोलले तसे ते आता याप्रश्नीही खोटे बोलत आहेत. या विधेयकावरून पंतप्रधान मोदी हे जनतेला भीती दाखवित आहेत. मात्र आता आम्ही त्यांना भीती दाखविणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर …

Read More »