राजकारण

उध्दव ठाकरे म्हणाले, रात्रीस चालेचा नवा खेळ सुरू झालाय संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपावर टीका

मुंबईः विशेष प्रतिनिधी मध्यरात्रीपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने पवारसाहेबांनी चित्र स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हा खेळ सुरु आहे, तो लाजिरवाणा आहे. नवं हिंदुत्व दाखवलं जात आहे. ते हिंदुत्व नाही. ईव्हीएमचा खेळखंडोबा पुरला नाही म्हणून हा रात्रीस खेळ चालेचा खेळ सुरू केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भल्या पहाटे स्थापन झालेल्या …

Read More »

शिकाँरात आम्ही आहोत…राहणार आणि सरकारही येणार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्याचबरोबर जे आमदार त्यांच्यासोबत गेले ते परत आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडे येत असल्याचे सांगत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहोत, एकत्र राहणार असून राज्यात या तीन पक्षाचे सरकार येणार …

Read More »

रात्रीस खेळ रंगला अन सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिसले राष्ट्रपती राजवट संपुष्टात येत देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचा शपथविधी

मुंबईः विशेष प्रतिनिधी शुक्रवारी रात्रीपर्यंत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर रात्री उशीराने वेगळाच रंगत भल्या पहाटे ५.४५ वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा शपथविधी झाल्याचे चित्र अवघ्या महाराष्ट्राला पाह्यला मिळाले. शिकाँराच्या …

Read More »

शिकाँराच्या मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील बहुचर्चित शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार स्थापनेची निश्चिती झाली असून या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे राहणार आहे. तसेच उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी सहमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. वरळी येथील नेहरू सेंटर येथील एका पंचतारांकित …

Read More »

भाजपा वगळून सत्ता स्थापन करण्याची काँ-राच्या मित्रपक्षांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीची बैठक संपन्न

मुंबईः प्रतिनिधी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जी चर्चा झाली याबाबतची संपूर्ण माहिती आघाडीतील मित्र पक्षांना देण्यात आली असून भाजप वगळून सरकार स्थापन व्हावे असे मित्र पक्षांनाही वाटत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडीतील मित्रपक्षाच्या …

Read More »

सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य …

Read More »

२०१४ साली संख्याबळाची माहिती न देताच फडणवीस सरकार स्थापन माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी गतवेळी अर्थात २०१४ साली विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर राज्यात स्थापन करताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना संख्याबळाची कोणतीही माहिती दिली नव्हती. तरीही त्यांनी विधिमंडळात बहुमत सिध्द केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारात उघडकीस आली. आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहेत. पण …

Read More »

शिकाँरासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी लवकरच शिवसेनेशी चर्चा करणार राष्ट्रवादीच्या साक्षीने काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासंदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादीतील चर्चा पूर्ण झाली आहे. या चर्चेची माहिती लवकरच आघाडीतील घटकपक्षांना देण्यात येणार असून त्यानंतर लवकरच पुढील चर्चा शिवसेनेशी करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. नवी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीमधील चर्चेची शेवटची फेरी …

Read More »

पंतप्रधान ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करावा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण ग्रामीण योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. गृहनिर्माण दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार- पंतप्रधान मोदी यांची भेट मदत वाटपासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची मागणी

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला सत्ता स्थापन करण्याकरीता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शिकाँराचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र या भेटीनंतर पवार यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना …

Read More »