राजकारण

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

भाजपच्या गोयल यांच्या युनायटेड फॉस्फरसच्या उपाध्यक्षा व्हीजेटीआयच्या अध्यक्ष काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणली. त्यानंतर भाजपच्या पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांच्या या कंपनीच्या उपाध्यक्षा सँड्रा आर. श्रॉफ यांची व्हीजेटीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे ही नियुक्ती भाजपचे सरकार आल्यानंतर …

Read More »

दुपारी १ वाजेपर्यंत ३० तर ३ वाजेपर्यंत ४६ टक्के मतदान लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.१९ टक्के तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४६. १३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान …

Read More »

या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका

नाशिकः प्रतिनिधी या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला. महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या …

Read More »

पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का ? भाजप नेते विनोद तावडे यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. एका वृत्त वाहिनीवर मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, २००४ ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील. हे कोणाला वाटले नव्हते, कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन …

Read More »

त्या प्रचार साहित्याशी भाजपचा संबध नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी खार येथे काल निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचे प्रचार साहित्य नसल्याचा खुलासा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची छपाई होत असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. तसेच याप्रश्नी पत्रकार परिषद घेत ही कंपनी …

Read More »

विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस कंपनीशी भाजपची भागीदारी देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारातः काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय …

Read More »

काँग्रेसच्या निषेधाचा आवाज आम्ही ऐकलाच नाही काँग्रेसच्या निषेधानंतरही भाजपकडून सवाल

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपकडून प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात येत असून या राजकारणाच्या गोंधळात दहशतवादी आणि नक्षलग्रस्तांच्या कारवायाबद्दल विरोधकांनी काढलेल्या निषेध पत्रकाची खातरजमा न करण्याची तसदी भाजपने घेतली नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निषेध पत्रक काढूनही भाजपकडून मात्र काँग्रेस -राष्ट्रवादी त्यांच्याबाबत गप्प का असा सवाल विचारत स्वतःच्या …

Read More »

राफेल प्रकरणी प्रसारमाध्यमांनी छापलेली कागदपत्रे ग्राह्य धरणार सर्वाेच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला झटका

नवी दिल्लीः प्रतिनिधी राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धक्का दिला असून त्यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांना घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. फ्रान्ससमवेत करण्यात आलेल्या राफेल कराराच्या निकालाची फेरतपासणी करण्यासाठी ज्या दस्तऐवजावर विशेषाधिकारी असे नमूद केले आहे. त्यावर अवलंबून राहता येणं शक्य होणार …

Read More »

मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडीला जाहीर पाठिंबा राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषणा केली. यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा …

Read More »