राजकारण

पार्थ पवार, डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी अखेर जाहीर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरी- धनराज महाले, नाशिक- समीर भुजबळ, शिरुर- डॉ अमोल कोल्हे, बीड – बजरंग सोनवणे, मावळ- पार्थ पवार या नावांची घोषणा केली. …

Read More »

सीएसएमटी दुर्घटनेतील पीडीतांच्या घरातील व्यक्तीला नोकरीत घ्या काही लाखाच्या मदतीने त्यांचे काही होणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भावना

मुंबईः प्रतिनिधी कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. …

Read More »

दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …

Read More »

लोकसभा निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार महिला मतदारांचा टक्का वाढला

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची …

Read More »

भाजपच्या कोट्यातील महामंडळावरील सदस्यांची यादी जाहीर ८ महामंडळावरील सदस्यांच्या नावाची यादी प्रसिध्द

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या महामंडळावरील सदस्यांची नियुक्ती लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी ९ महामंडळावरील सदस्यांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली. राज्य सरकारच्या विविध महामंडळांवरील शिवसेनेच्या कोट्यातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कोट्यातील सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. राज्य अपंग वित्त व विकास महामंडळावर …

Read More »

३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, …

Read More »

पोलिस प्रशासन शासन आदेशानुसार काम करते, दबावाखाली नाही पोलिस महासंचालक जायस्वाल यांचे प्रतिपादन

औरंगाबादः प्रतिनिधी पोलिस यंत्रणा आदेशानुसार काम करते कोणाच्याही दबावाखाली नाही.असे स्पष्टीकरण पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत दिले. गेल्या काही महान्यांपूर्वी ए.टी.एस आणि सी.बी.आय. ने औरंगाबादेत संयुक्त कारवाई करत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन प्रकरणी काही संशयित अटक केले होते. यावर भाष्य करतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. मराठवाड्यात निवडणूकांच्या …

Read More »

पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सुजयचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी अहमदनगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता, अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेले विधान दुर्देवी होतं. याचं मला व्यक्तिशः वाईट वाटलं. आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं. पवारांचे हे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय …

Read More »

गतवेळच्या पराभवामागे मतदान यंत्रातील गडबड मतदान यंत्रावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे शरद पवार यांचे आवाहन

ठाणे : प्रतिनिधी गणेश नाईक यांनी नवी मुंबईला विकसीत केले आहे. त्यांनी अखंड काम केले आहे. तरीही त्यांचा मागील निवडणुकीमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्यांचा पराभव हा मतदान यंत्रातील गडबडीमुळेच झाला असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मतदान प्रतिनिधीसह मतदान यंत्रावर बाराकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद …

Read More »

सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »