स्टॅड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर आणि दिल्लीतील पंतप्रधान मोदी यांच्यावर विडंबनात्मक गायलेले गाण आज सकाळी प्रसारीत झालं. त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी …
Read More »आता अजित पवार यांनीच केलं स्पष्ट, लाडक्या बहिणींचा लाभ या महिलांना मिळणार हप्ताही वाढीव देणार असल्याची दिली माहिती
मागील काही दिवसांपासून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या योजनेतून अनेक महिलांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त पुढे येत होते. तसेच अनेक महिलांना या योजनेतून कमी करणार असल्याची चर्चाही वेळोवेळी रंगत होती. इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा वाढीव हप्ताही देणार असल्याचे चर्चा यावेळी सुरु झाली होती. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाचा घेतला आढावा
देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, आता वाहन चालवताना मोबाईल बघणाऱ्यांवर होणार कारवाई नवी नियमावली आणणारः बस चालवत मोबाईल वर मॅच बघणाऱ्या चालकाला एसटीने केले बडतर्फ
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले असून संबंधित खाजगी कंपनीला ₹ ५०००/- इतका दंड ठोठावला आहे. २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट …
Read More »संजय निरूपम यांची टीका, दंगेखोरांची पाठराखण करणाऱ्या उबाठाचे औरंगजेब नवे आराध्य दैवत नागपूर हिंसाचारातील दोषींवर बुलडोझर कारवाईची मागणी
नागपूर हिंसाचारातील दंगेखोरांची पाठराखण कऱणाऱ्या उबाठाचे औरंगजेब आता नवीन आराध्य दैवत बनले आहे. मातोश्रीवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो काढून औरंगजेबाचा फोटो लावला जाईल, अशी टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत निरुपम यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. संजय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, नाशिकला नवा पालकमंत्री देणार नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार
मागील अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्र्याचा वाद भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सुरु आहे. शिवसेनेचे दादाजी भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे. तर नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद गिरिष महाजन यांच्याकडे देण्यात आले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला नवा पालकमंत्री देणार असल्याची घोषणा करत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबतचा …
Read More »सर्व पक्षिय आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतले हे निर्णय निवडणूक यादीत नावांचा समावेश आणि दुरुस्ती मार्गदर्शक तत्त्वे याबाबत कायदेशीर चौकट
भारताचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले …
Read More »मुंबई ठाण्यातील रेल्वे प्रश्नी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार
मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल,… मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? सीबीएसई बोर्ड सुरु करण्यावरून राज्य सरकारला सवाल
राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »अजित पवार यांची शेतकऱ्यांना गोड बातमी, वीस टक्के निर्यात शुल्क रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मानले आभार
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि. १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या …
Read More »
Marathi e-Batmya